Home /News /entertainment /

'Taarak Mehta...' फेम जेठालालच्या बॅगेची अवस्था पाहून आवरणार नाही हसू! तुम्ही पाहिला का हा VIDEO?

'Taarak Mehta...' फेम जेठालालच्या बॅगेची अवस्था पाहून आवरणार नाही हसू! तुम्ही पाहिला का हा VIDEO?

छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका 'म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashamh) या विनोदी मालिकेला ओळखलं जातं. गेली 13 वर्षे सातत्याने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

  मुंबई, 6 जानेवारी-   छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त काळ चालणारी मालिका 'म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashamh)   या विनोदी मालिकेला ओळखलं जातं. गेली 13 वर्षे सातत्याने ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सहजसाध्या विनोदाने आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. त्यामुळे या मालिकेची आणि त्यातील प्रत्येक कलाकाराची लोकप्रियता प्रचंड आहे. जेठालाल   (Jethalal)  या व्यक्तिरेखेला प्रेक्षक अफाट प्रेम देतात. ही मालिका अभिनेते दिलीप जोशी   (Dilip Joshi)  यांनी साकारली आहे. उक्ताच जेठालाल एयरपोर्टवरून दिसून आले. त्यांचा एक व्हायरल झालेला व्हिडीओसुद्धा चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी एयरपोर्टवर दिसून येत आहेत.ते यावेळी आपल्या कुटुंबासोबत होते. जेठालाल एकदम घाईघाईत आपला ट्रॉली बॅग घेऊन जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचं पालन करत चेहरा काळ्या मास्कने झाकला होता. तसेच त्यांना आपल्या कपाळावर लाल टिळासुद्धा लावला होता. एकीकडे हे सर्व असताना. दुसरीकडे नेटकऱ्यांची नजर त्यांच्या हातातील ट्रॉली बॅगवर गेली. जेठालाल घाईघाईत ही बॅग खेचत असतानां. बॅग अचानक इकडून तिकडे लडबडू लागली. त्यांच्या बॅगची ही मजेशीर अवस्था पाहून नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्स देण्यास सुरुवात केली.
  'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे दिलीप जोशी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ;आज शोधला ना तुम्ही खरा स्टार'. तर आणखी एकाने म्हटलं, 'जेठालाल खऱ्या आयुष्यतसुद्धा एक कॉमेडियन आहेत. बॅग बघा कशी फिरत आहे'. त्यांच्या विनोदी अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मालिकेत ते इतक्या सहजरित्या एखाद्या प्रसंगाला मजेशीर बनवता की चाहत्यांना ते बघतच राहावं असं वाटतं. दयाबेन आणि जेठालालची हटके केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडते. परंतु बरेच दिवस दयाबेन अर्थात दिशा वकानी मालिकेत नाही. त्यामुळे चाहते ही केमेस्ट्री मिस करत आहेत.तसेच मालिकेतील जेठालालचा क्रश अर्थात बबितासोबतसुद्धा चाहते त्यांना प्रचंड पंसत करतात. नुकताच दिलीप जोशी यांनी आपल्या मुलीला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणारी प्रतिक्रिया दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. यामध्ये त्यांच्या मुलीचे केस पांढरे झालेले दिसत होते. लग्नातसुद्धा मुलें केस काही नाही रंगवले अशा अनेक प्रतिक्रिया देत काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

  पुढील बातम्या