Home /News /entertainment /

'Taarak Mehta..' फेम 'जेठालाल'ची लेक लग्नात पांढऱ्या केसांवरून झाली होती ट्रोल; दिलीप जोशींनी दिलं सडेतोड उत्तर

'Taarak Mehta..' फेम 'जेठालाल'ची लेक लग्नात पांढऱ्या केसांवरून झाली होती ट्रोल; दिलीप जोशींनी दिलं सडेतोड उत्तर

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या विनोदी मालिकेत 'जेठालाल' (Jethalal) ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.या मालिकेतून त्यांनी गेली 14 वर्षे चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जानेवारी-  'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)   या विनोदी मालिकेत 'जेठालाल' (Jethalal)  ची भूमिका साकारणारे दिलीप जोशी  (Dilip Joshi)  प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.या मालिकेतून त्यांनी गेली 14 वर्षे चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे चाहते त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असतात. नुकतंच त्यांच्या लेकीचा विवाहसोहळा  (Dilip Joshi Daughter Wedding)  पार पडला होता. त्याचे फोटो शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु या फोटोमध्ये त्यांच्या मुलीचे केस पांढरे झालेले दिसून येत होते. त्यावरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या सर्व प्रकरणावर आता दिलीप जोशी यांनी उत्तर देत सर्वांना चपराक दिली आहे. अभिनेते दिलीप जोशी यांची मुलगी नियती जोशी काही दिवसांपूर्वी लग्नाच्याबेडीत अडकली आहे. नियतीने आपल्या एनआरआय बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये अगदी राजेशाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये दिलीप जोशी आपल्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेताना दिसून आले होते. या फोटोंमध्ये मुलगी नियती सुंदर अशा वधूरूपात तयार झाली होती. परंतु या फोटोंमध्ये नियतीचे केस पांढरे दिसत होते. यावरून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. सुरुवातीला काहींना नियतीने आपल्या केसांना कलरमेड केल्याचं सर्वांना वाटलं, परंतु नंतर समजलं कि हे तिचे अकाली पांढरे झालेले केस आहेत. त्यांनतर काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं तर नेटकऱ्यांनी जोरदार टीकाही केली होती. त्यांनतर आता जेठालाल अर्थातच दिलीप जोशी यांनी आपल्या मुलीचं समर्थन करत तिच्या या निर्णयामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. दिलीप जोशी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे, की 'नियतीचे पांढरे केस आमच्यासाठी कधीच अडचण नाही ठरले. हा मुद्दा कधीच आमच्या चर्चेत आला नाही. आमच्या घरात कधीच तिच्या पांढऱ्या केसांवर कोणीही काहीही बोललेलं नाहीय. कारण आम्ही आमच्या कुटूंबात जो जसा आहे तो तसाच आहे त्याला आपण तसंच मान्य करायचं या गोष्टीवर विश्वास ठेवतो. आणि त्या गोष्टीचं काटेकोरपणे पालनसुद्धा करतो. त्यामुळे आम्हाला तिच्या पांढऱ्या केसांबद्दल कधीही बोलण्याची गरज नाही पडली. तसेच मला आनंद आहे की तिने आपल्या लग्नात इतका मोठा निर्णय इतक्या धाडसाने आणि आत्मविश्वासाने घेतला. ती आपण जसं तसं दाखवण्यास अजिबात घाबरली नाही. त्यामुळे मला आनंद होत आहे. परंतु मला वाटलं नव्हतं की तिचे पांढरे केस इतका चर्चेचा विषय ठरेल, किंवा त्यावरून तिला ट्रोल केलं जाईल'. (हे वाचा: अंकिता लोखंडेपेक्षा कमी नव्हता 'जेठालाल' चा थाट! असा पार पडला मुलीचा ...) पुढं त्यांनी म्हटलं, 'माझं असं मत आहे, की आपण जसे आहोत तसेच जगासमोर यायला हवं. यामध्ये लाज बाळगायची गरज नाही. सुरुवातीला नियतीबद्दल लोकांनी अनेक प्रकारच्या चर्चा केल्या. अनेक लोकांनी तिला ट्रोल केलं. तिची खिल्ली उडवली. परंतु ती अजिबात डगमगली नाही. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. त्यामुळे आज तिने सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे'. असं म्हणत त्यांनी आपल्या लेकीचं कौतुक केलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

    पुढील बातम्या