Home /News /entertainment /

Taarak Mehta...फेम बबिता बनली 'बिझनेस वुमेन', मुनमुन दत्ताने सुरु केला नवा व्यवसाय,पाहा VIDEO

Taarak Mehta...फेम बबिता बनली 'बिझनेस वुमेन', मुनमुन दत्ताने सुरु केला नवा व्यवसाय,पाहा VIDEO

मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकरांना अभिनयासोबतच (Acting) व्यवसायाची (Business) आवड असते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मनोरंजनसृष्टीत काम करत आपल्या व्यवसायाचासुद्धा चांगला जम बसवला आहे.

    मुंबई, 19 फेब्रुवारी- मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकरांना अभिनयासोबतच   (Acting)  व्यवसायाची (Business)  आवड असते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मनोरंजनसृष्टीत काम करत आपल्या व्यवसायाचासुद्धा चांगला जम बसवला आहे. काहींनी कॉस्मेटिक्समध्ये तर काहींनी फिटनेस क्लब्समध्ये, काहींनी हॉटेल व्यवसायात तर काहींनी क्लॉथ ब्रँडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  फेम बबिता   (Babita)  अर्थातच अभिनेत्री मुनमुन दत्ताने  (Munmun Dutta)   व्यावसायिक जगतात पाऊल ठेवलं आहे. अभिनेत्रीने स्वतः आपल्या सोशल मीडियाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या नवीन व्यवसायाबद्दल बोलताना दिसत आहे. यामध्ये मुनमुन तिच्या नवीन कामाबद्दल खूप उत्सुक दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, ती खाद्यपदार्थ व्यवसायात उतरली आहे. मुनमुनला खाद्यपदार्थांची खूप आवड आहे. त्यामुळे तिने आपल्यासाठी खाद्यपदार्थ व्यवसायाची निवड आहे. परंतु या व्यवसायात मुनमुन दत्ता एकटी नाही. या व्यवसायात तिच्यासोबत तिचा मानलेला भाऊ आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटचे मालक केयूर सेठसुद्धा आहे. मुनमुन आणि केयूर जवळपास 14 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अशा परिस्थितीत मुनमुनही आपल्या भावासोबत काम करताना खूप आनंदी आहे. आपल्या व्हिडिओमध्ये मुनमुन दत्ताने आपल्या नवीन कामाशी संबंधित सविस्तर माहिती शेअर केली आहे. मुनमुन म्हणते की हे एक क्लाउड किचन आहे. ज्यामध्ये Monk Spoon, Feb87, ठेपलासारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. यासह, अभिनेत्रीने व्हेंचर लॉन्चच्या पडद्यामागील गोष्टीदेखील दाखवल्या आहेत. ज्यावरून हे दिसून येते की मुनमुन तिच्या नव्या कामाबद्दल किती उत्सुक आहे. आणि आपल्या नव्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रत्यत्न करणार आहे. विशेष म्हणजे मुनमुन दत्ताची सर्व उत्पादने Zomato आणि Swiggy मध्ये देखील उपलब्ध असतील.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Start business, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actress

    पुढील बातम्या