VIDEO : ‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसीचा व्हिडिओ व्हायरल

VIDEO : ‘प्रेम म्हणजे थप्पड मारण्याचं लायसन्स नाही’, तापसीचा व्हिडिओ व्हायरल

व्हॅलेंटाइन डे निमित्त अभिनेत्री तापसी पन्नूने 'थप्पड'वर भाष्य करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये अनेक व्हर्सटाइल अभिनेत्री आहेत. त्यालीच एक म्हणजे तापसी पन्नू. तापसीने दाक्षिणात्य सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपट केले आहेत. आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. येत्या 28 फेब्रुवारीला अभिनेत्री तापसी पन्नूचा नवा सिनेमा ‘थप्पड’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तापसीचा हा चित्रपट महिलांना सहजपणे कानाखाली मारून त्यावर काहीच न झाल्यासारखं रिअॅक्ट करणाऱ्या प्रत्येकाच्या मानसिकेतवर भाष्य करणारा आहे. एकमेकावर जिवापाड प्रेम करणाऱ्या दोघांमध्ये एक ‘थप्पड’ कशाप्रकारे नवं वळण आणते हे या चित्रपटात दाखवलं जाणार आहे.

काल म्हणजेच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे पार पडला. आणि यानिमित्त तापसीने सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तापसी प्रेमामध्ये अगदी सहजपणे येणाऱ्या ‘थप्पड’वर भाष्य करत आहे. हा व्हिडिओ म्हणजे कौटुंबिक हिंस्त्रा करणाऱ्या प्रत्येकालाच जोरदार कानाखाली लगावल्याच दिसत आहे. तापसीने खास व्हॅलेंटाइन डे निमित्त हा व्हिडिओ रिलीज केला आहे.

Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

हा व्हिडिओ बघताना जरी तो मिश्किल स्वरुपातील वाटत असला तरी तो बघताना प्रेक्षकांना एक सामाजिक जाणीवेची ओळख करून देतो. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू एका मुलाला बघण्यासाठी गेली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या भेटीत तापसी आणि त्या मुलाचं कुटुंब अगदी सहजपणे ‘थप्पड’बद्दल बोलताना दिसत आहेत.

'अभिनेत्री होण्यासाठी कोणासोबत अय्याशी केली नाही', तनुश्री दत्ता पुन्हा भडकली

या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, आपल्या समाजात एका महिलेला कानाखाली मारणं ही फारच सामान्य गोष्ट आहे. हा व्हिडिओ एक सामाजिक संदेश देत संपतो. या व्हिडिओच्या शेवटी तापसी प्रेक्षकांना विचारते की, ‘प्रेम केलं म्हणजे थप्पड मारण्यासाठी लायसन्स मिळतं का?'. तापसीच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळत आहेत.

काही प्रेक्षकांनी या व्हिडिओवर हा एक समाजिक संदेश देणारा उत्तम व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. कौटुंबिक हिंसेविरोधात इतक्या सहजपणे भाष्य करत. कौटुंबिक हिंसा करणाऱ्यांना समज देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून केल्याचंही काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

तापसीचा 'थप्पड' सिनेमा येत्या 26 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटाचे 2 ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी तापसीने केली होती. तापसीच्या या मागणीमुळे सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा होती.

‘सिद्धार्थ शुक्लानं अनेकदा मला मारहाण केली’, शिल्पा शिंदेचा खळबळजनक आरोप

First published: February 15, 2020, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading