तैमुर अली खानला डेट करण्याची 'या' अभिनेत्रीची इच्छा

तैमुर अली खानला डेट करण्याची 'या' अभिनेत्रीची इच्छा

'पिंक' सिनेमा फेम तापसी पन्नूनं तैमुरला डेट करायची इच्छा बोलून दाखवली आहे.

  • Share this:

मुंबई, 7मार्च : बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खानचा मुलगा तैमुर अली खान नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणाने चर्चेत असतो. भाऊ इब्राहिम पेक्षाही तैमुरच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. इतकंच नाही चंदेरी दुनिया बॉलिवूडमधील काही स्टार कलाकारही तैमुरचे चाहते आहेत. नुकतेच एका अभिनेत्रीनं चक्क तैमुरला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'पिंक' सिनेमा फेम तापसी पन्नू आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तापसीनं तैमुरला डेट करायची इच्छा बोलून दाखवली आहे.

दमदार अभिनयामुळे तापासी पन्नू सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत कोणाला डेट करायला आवडेल? असा प्रश्न तापसीला विचारण्यात आला. यावर तिनं मी तैमुरला डेटवर घेऊन जाऊ शकते का? असा प्रतिप्रश्न विचारला.

तापसी पन्नूपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने भविष्यात तैमुरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

वाचा : PHOTOS : पप्पा सैफ अलीकडून बॅडमिंटनच्या टिप्स घेताय तैमुर

पाहा : तैमुरचे हे झोपाळ्यावरचे क्युट फोटो पाहिलेत का?

वाचा : सैफ-करिनाची अशीही रोमँटिक अदा!

तापसीनं तैमुरसंदर्भात केलेल्या विधानावर आई करीना कपूर काय प्रतिक्रिया देते, याची प्रतीक्षा आहे. क्युटनेसमुळे प्रसिद्धिच्या झोतात आलेल्या तैमुरनं मार्केट व्हॅल्यूच्याबाबतीत फक्त भाऊ इब्राहिमलाच नाही तर बॉलिवूडचे तिन्ही खान म्हणजेच शाहरुख, सलमान आणि आमिर यांनाही मागे टाकलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading