Home /News /entertainment /

भारताचा अभिमान मिताली राजची भूमिका साकारणार ही स्टार अभिनेत्री, Shabbas Mithu 1st Look रिलीज

भारताचा अभिमान मिताली राजची भूमिका साकारणार ही स्टार अभिनेत्री, Shabbas Mithu 1st Look रिलीज

भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा (Mithali Raj) बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  मुंबई, 29 जानेवारी : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंडची चलती आहे. खासकरुन भारतीय खेळडूच्या बायोपिकना बॉलिवूडमध्ये विशेष महत्त्व दिलं जात आहे. यापूर्वी एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंह, मेरी कोम या भारतीय खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक रिलीज झाले आहेत. त्यानंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरही बायोपिकची निर्मिती होत आहे. अशात आता भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा (Mithali Raj) बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजच्या बायोपिक ‘शाब्बास मिथू’ (Shabbas Mithu) चा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आणि या सोबतच या सिनेमाची रिलीज डेटची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात बॉलिवूडटची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu)मितालीची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा सिनेमा 5 फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे. सलमानच्या ‘राधे’मधील ‘ती’ 20 मिनिटं असणार खास, भाईजाननं खर्च केलेत करोडो रुपये
  तापसीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर‘शाब्बास मिथू’ (Shabbas Mithu)चा फर्स्ट लुक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तापसीनं लिहिलं, “मला नेहमीच विचारलं जातं की तुझा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण आहे. पण खरं तर असं विचारायला हवं की तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण?” हे त्या व्यक्तीचं वक्तव्य आहे जिने प्रत्येक क्रिकेटप्रेमीला हा विचार करण्यास भाग पाडलं की तो क्रिकेटवर प्रेम करतो की ते खेळत असणाऱ्या खेळडूच्या जेंडरवर. कॅप्टन तुम्ही नेहमीच अल्टीमेट गेम चेंजर राहाल.’ VIDEO: याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग मिताली राजनं 32 टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात 2012, 2014 आणि 2016 तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधारी केली. 2006मध्ये महिला संघानं पहिला टी-20 सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीनं 89 टी-20 सामने खेळले आहे. यात तिनं 2364 धावा केल्या आहेत, यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 97 हा मितालीचा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे. मितालीनं 3 सप्टेंबर 2019 मध्ये टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. बॉलिवूडपासून दूर पण ग्लॅमरच्या बाबतीत करिनालाही मागे टाकते कपूर घराण्याची लेक 2021 वर्ल्ड कपसाठी निवृत्तीचा घेतला निर्णय निवृत्तीचे कारण सांगताना ती म्हणाली, 2021मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपच्या तयारीसाठी हा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी माझे योगदान देऊ इच्छिते. मला नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या बीसीसीआयचे मी आभार मानते. भारताच्या टी-20 संघाला मी शुभेच्छा देते”, असे सांगितले.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Mithali raj, Tapasi pannu

  पुढील बातम्या