'रश्मी रॉकेट' सिनेमातला PHOTO व्हायरल; या भूमिकेत दिसणार तापसी पन्नू

'रश्मी रॉकेट' सिनेमातला PHOTO व्हायरल; या भूमिकेत दिसणार तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या रश्मी रॉकेट या सिनेमासठी प्रचंड मेहनत घेत आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) नव्या सिनेमाचं शूटिंग जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं नाव ‘रश्मी रॉकेट’ (Rashmi Rocket) असं आहे. या सिनेमामध्ये तापसी अ‍ॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कारवा’ सिनेमाचा दिग्दर्शक आकर्ष खुराना (Akarsha Khurana) या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहे. तापसी आपल्या सिनेमांसाठी नेहमीच वेगवेगळी आव्हानं स्वीकारते. या फिल्ममध्ये एका अ‍ॅथलिटची भूमिका साकारण्यासाठीही तापसी खूप कष्ट घेत आहे. या सिनेमाची निर्मिती रोनी स्क्रूवालाने केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

तापसीने नुकताच सोशस मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शूटिंगच्या कपड्यांमध्ये पळताना दिसत आहे. या सिनेमाचं शूट अंतिम टप्प्यात आलं आहे. ‘मी अजूनही माझ्या हावभावांवर मेहनत घेतेय’ असं कॅप्शन तापसीने दिलं आहे. या सिनेमातला तापसीचा लूक अत्यंत वेगळा आहे. या सिनेमामध्ये ती एका गुजराती मुलीची भूमिका साकारत आहे. जिने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर इंटरनॅशनल लेव्हलवर स्वत:चं नाव नेऊन ठेवलं. रांचीमध्ये तिच्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

मिर्झापूर 2 मधील प्रियांशू तापसीसोबत झळकणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रीलिज होईल अशी शक्यता आहे. रश्मी रॉकेटचं बरचसं शूटिंग भुजमध्ये होणार आहे. या सिनेमासोबतच तापसीच्या हातात ‘हसीन दिलरुबा’ 'लूप लपेटा' असे चित्रपटही आहेत. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्येही तापसी दिसून येणार आहे. या सिनेमाचं नाव ‘शाबाश मितू’ असं असणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 22, 2020, 11:35 AM IST

ताज्या बातम्या