गुरुद्वाराबाहेर तरुणाने काढली तापसीची छेड, रागात अभिनेत्रीने बोट धरलं आणि...

गुरुद्वाराबाहेर तरुणाने काढली तापसीची छेड, रागात अभिनेत्रीने बोट धरलं आणि...

गुरुद्वाराबाहेर छेड काढणाऱ्याला तापसीनं चांगलाच धडा शिकवला, वाचा नेमकं काय घडलं

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिचा आगामी सिनेमा ‘शाब्बास मितू’ मुळे चर्चेत आहे. भारताची महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजच्या बायोपिकमध्ये तापसी मितालीची व्यक्तिरेख साकारत आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतच रिलीज झालं. ज्यामुळे तापसीचं खूप कौतुक केलं जात आहे. नुकतंच तिनं करिना कपूरचा टॉक शो ‘व्हॉट वीमेन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं तिच्या आयुष्यातील एक सहासी अनुभव शेअर केला. ज्याने सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल.

करिना कपूरच्या टॉक शोमध्ये बोलताना तापसी सांगितलं, दिल्लीला असताना ती अनेकादा गुरुपर्वाच्यावेळी गुरुद्वारामध्ये जात असे. त्या ठिकाणी नेहमीच खूप गर्दी असते. त्यावेळी तिच्यासोबत एक छेडछाडीची घटना घडली.

फोटोग्राफर्सना पाहून अक्षय कुमारनं हे काय केलं? VIDEO पाहिल्यावर पोट धरून हसाल

तापसी सांगते, त्या ठिकाणी एवढी गर्दी असते की की लोकांना हमखास एकमेकांचा धक्का लागतो. अनेकदा मला अशावेळी विचित्र वाटायचं पण मी दुर्लक्ष करायचे. पण मला कोणी छेडेल किंवा असं काही घडेल असं मला कधी वाटलं नव्हतं कारण मी सामन्य जीवन जगले आहे. त्यामुळे मला माहित आहे की मी स्वतःला सांभाळू शकते. पण एक दिवस मला जाणवलं की कोणीतरी मला मागून जाणूनबुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटलं की कोणतरी मला हॅरॅस करत आहे.

समलैंगिक विवाहाबद्दल विधान करून फसला आयुष्मान खुराना, Twitter वर मागितली माफी

आपल्या या अनुभवा बद्दल सांगताना तापसी पुढे म्हणाली, जेव्हा मला या गोष्टीचा विश्वास झाला की कोणतरी हे जाणूनबुजून करत आहे. मला वाईट हेतूनं मागून स्पर्श करत आहे. त्यावेळी मी झटकन माझा हात मागे नेला त्या माणसाचं बोट पकडलं आणि जोरात मोडलं. त्यानंतर मी तिथे अजिबात थांबले नाही.

सलमानच्या गोव्यात येण्यावर बंदी? सेल्फी प्रकरण दबंग खानला भोवणार

तापसी पन्नूनं दिल्लीतून मुंबईला येत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडमधील एक खंबीर अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तापसीनं पिंक सिनेमात एक दमदार भूमिका साकारली होती. या सिनेमात तिच्यासोबत छेडछाड करणाऱ्या मुलाला तिनं चोख उत्तर दिलं होतं. पण हीच गोष्ट तिनं तिच्या रिअल लाइफमध्येही केली आहे. त्यामुळे तिचं कौतुक केलं जात आहे.

तापसी सध्या मिताली राजच्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा 5 फेब्रुवारी 2021ला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकीया करत आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर तापसीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली होती.

First published: January 30, 2020, 9:15 AM IST

ताज्या बातम्या