मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Shabash Mithu' साठी तापसीची जोरदार तयारी सुरू; सरावाचे PHOTOS व्हायरल

'Shabash Mithu' साठी तापसीची जोरदार तयारी सुरू; सरावाचे PHOTOS व्हायरल

तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबाश  मिथु' (Shabash Mithu) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  तापसीनं अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर (Shared photos on set) केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 26 मार्च : गेल्या काही काळापासून बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात खूपच व्यस्त आहे. एका पाठोपाठ एक चित्रपटांचं चित्रीकरण करण्याचा तिने सपाटाच लावला आहे. सध्या ती आपल्या आगामी 'शाबाश  मिथु' (Shabash Mithu) या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  तापसीने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर (Shared photos on set) केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल (Viral) होतं आहेत.

हा चित्रपट भारतीय महिला वनडे क्रिकेट टीमची कप्तान मिथाली (Mithali Raj) राजच्या जीवनावर अधारित आहे. यामध्ये तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फिट दिसण्यासाठी तापसी मैदानात घाम गाळताना दिसत आहे. तापसीने आपल्या  इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लब्स आणि हेलमेट घालून धावपट्टीवर उभी राहिलेली दिसत आहे. तापसीने हा फो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आनंद आहे, आत्मविश्वास आहे, धावपट्टी तयार आहे, #शाबास मिथु.

तापसी पन्नु गेल्या काही काळापासून मिथाली राजच्या व्यक्तीरेखेसाठी स्वतःला तयार करत आहे. त्यासाठी ती खूप सराव करत आहे. आता तापसी एखाद्या महिला क्रिकेटर सारखी दिसू लागली आहे. त्याचबरोबर तापसी मिथालीच्या शैलीने फलंदाजी करण्याची कला शिकत आहे. तापसीने नुकताच कव्हर ड्राइव्ह शॉट खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

हे ही वाचा- तुम्हालाच नाही तर तापसी पन्नूलाही विजेच्या बिलाचा बसला शॉक; तिने काय केलं पाहा

'शाबाश मिथु' या चित्रपटाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे, तर याची कथा प्रिया अवन यांनी लिहिली आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत अभिनेता ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त तापसी पन्नू 'हसीना दिलरुबा', 'रश्मी रॉकेट', आणि 'लूप लपेटा' या चित्रपटांतही झळकणार आहे. लूप लपेटा या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला असून हा चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Taapsee Pannu