तापसी पन्नूला असला नवरा नको गं बाई!

तापसी पन्नूला असला नवरा नको गं बाई!

मीडियानं अभिनेत्री तापसी पन्नूला लग्नाविषयी विचारलं असता तिने खूपच जबरदस्त उत्तरं दिली.

  • Share this:

06 जानेवारी : विराट अनुष्काचं लग्न झाल्यापासून बॉलिवूडमध्ये सगळ्यांच्याच लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु आहे. पण बॉलिवूडच्या इतर अभिनेत्र्यांपेक्षा तापसी पन्नूची लग्नाची स्वप्न काही वेगळीच आहे. मीडियानं अभिनेत्री तापसी पन्नूला लग्नाविषयी विचारलं असता तिने खूपच जबरदस्त उत्तरं दिली.

तापसी म्हणाली की,'मला माझ्या लग्नाचा खूप बोलाबाला करायचा नाहीये. जितका विराट आणि अनुष्कानं केला.' असं बोलण्यामागे तिचा उद्देश होता की तिला कोणत्याही क्रिकेटर किंवा श्रीमंत व्यावसायिकाशी विवाह करायचा नाही आहे. ती म्हणाली की, 'मला कोणत्याही अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता किंवा कोणत्या श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करायचं नाही. मी माझं लग्न शांततेत करणार आहे.'

खरं तर काही दिवस तापसी आणि बॅडमिंटनपट्टू मेथियस यांच्या नात्याविषयी चर्चा होत्या. त्यामुळे तापसी कसा नवरा शोधतेय आणि कोणाशी तिचा शुभविवाह होणार यावर आता तिच्या चाहत्यांचंही लक्ष आहे.

 

First published: January 6, 2018, 3:52 PM IST

ताज्या बातम्या