तापसी पन्नूला करायचा आहे 'या' अभिनेत्याचा खून आणि 'या' अभिनेत्याशी करायचंय लग्न

तापसी पन्नूला करायचा आहे 'या' अभिनेत्याचा खून आणि 'या' अभिनेत्याशी करायचंय लग्न

तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी नुकतीच नेहा धुपियाच्या BFFs with Vogue च्या सीझन 3 मध्ये हजेरी लावली होती.

  • Share this:

मुंबई, 15 मे : अभिनेत्री तापसी पन्नू आणि विकी कौशल यांची 'मनमर्जियां'मधील ऑनस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा जेमतेम चालला असला तरीही विकी आणि तापसीच्या अभिनयाचं कौतुक मात्र झालं. पण आता नुकत्याच एका शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे तापसी सध्या चर्चेत आली आहे. या शोमध्ये तापसीनं विकीला मॅरेज मटेरिअल म्हणत, त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तापसी पन्नू आणि विकी कौशल यांनी नुकतीच नेहा धुपियाच्या  BFF's with Vogue च्या सीझन 3 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तापसीनं 'मनमर्जियां'चं शूटिंग सुरू होण्याआधीपासून आम्ही दोघंही हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांशी बोलायचो पण या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी आमची मैत्री घट्ट झालं असं सांगितलं. यावर विकीनं, तापसी खूपच मनमोकळी आणि बोलकी आहे आणि मी खूप चांगला श्रोता आहे अशी कोपरखळी तिला मारली.

 

View this post on Instagram

 

Neela Kukkad tey Laal Pari.. #Manmarziyaan #14thSept Styling & pc: @amandeepkaur87

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

या शोमध्ये तापसीनं विकी मला विकी हॉट वाटत नाही असंही म्हटलं. तिला अभिषेक बच्चन, वरुण धवन आणि विकी कौशल यांच्यामधून 'हुकअप, लग्न आणि खून' यांची निवड करण्यास सांगण्यात आलं. त्यावेळी तिनं वरुणसोबत हुकअप, अभिषेकचा खून आणि विकी कौशलशी लग्न करेन असं सांगितलं. तसेच तिनं विकी मॅरेज मटेरिअल आहे असंही म्हटलं.

 

View this post on Instagram

 

My two favourites: Pannu & Dhillon. The heart and soul of #Manmarziyaan 📷: @khamkhaphotoartist

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

तापसी लवकरच 'सांड' या सिनेमात झळकणार असून यात भूमी पेडणेकरचीही महत्वाची भूमिका आहे. याअगोदर तापसी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बदला'मध्ये दिसली होती. तर विकीचा 'उरी' सिनेमा प्रचंड गाजला. सध्या तो 'उद्धम सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून तो लवकरच करण जोहरच्या 'तख्त'मध्ये दिसणार आहे.

'उरी' फेम विकी कौशल भाड्याच्या घरात साजरा करणार वाढदिवस ?

VIDEO : माधुरी दीक्षितचे पाहायलाच हवेत असे 8 बेस्ट डान्स परफॉर्मन्स

First published: May 15, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading