मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Taapasee Pannu: प्रमोशनदरम्यानच तापसी आणि पापाराझींमध्ये सुरु झाला वाद; नंतर जे घडलं.., पाहा VIDEO

Taapasee Pannu: प्रमोशनदरम्यानच तापसी आणि पापाराझींमध्ये सुरु झाला वाद; नंतर जे घडलं.., पाहा VIDEO

तापसी पन्नूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझीसोबत वाद घालताना दिसून येत आहे.

तापसी पन्नूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझीसोबत वाद घालताना दिसून येत आहे.

तापसी पन्नूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझीसोबत वाद घालताना दिसून येत आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 9 ऑगस्ट-   कलाकार आणि पापाराझी यांच्यामध्ये अनेकवेळा चांगलं बॉन्डिंग दिसून येतं. तर बऱ्याचवेळा कलाकारांचं त्यांच्यासोबत खटकतंसुद्धा. असंच काहीसं अभिनेत्री तापसी पन्नूसोबतसुद्धा झालं आहे. तापसी पन्नूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री पापाराझीसोबत वाद घालताना दिसून येत आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तापसीच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली जेव्हा तापसी तिच्या आगामी 'दो बारा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये पोहोचली होती. दम्यान एका पापाराझीने तिला कार्यक्रमासाठी उशीर झाल्याचं सांगितल्याने त्यातून वाद सुरु झाला. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, एक फोटोग्राफर तापसी पन्नूला म्हणत आहे की, तुम्हाला खूप उशीर झाला आहे आणि आम्ही गेली दोन तास तुमची वाट पाहात आहोत. पापाराझीनेही तापसीकडे न थांबण्याची तक्रार केली. पापाराझींनी तिला म्हटलं, "आम्ही तुझ्यासाठीच इथे थांबलो आहोत." यावर तापसीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तिला दिलेल्या सूचनांचं पालन केल्याचं तिनं सांगितलं. यावेळी बोलताना तापसी म्हणाली, "मला जे सांगितलं होतं तेच मी करत आहे. तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात . "त्यानंतर तापसी आणि पापाराझींमध्ये शाब्दिक चकमक झाली.
(हे वाचा:Hansika Motwani: 'शाका लाका बूम बूम' गर्ल लवकरच करणार लग्न; राजकीय घराण्याची सून बनणार साऊथ सुंदरी हंसिका ) पापाराझींनी तापसी पन्नूला सांगितलं की तेही तिचीच वाट पाहात आहेत. तापसी पापाराझींना म्हणाली, “कृपया माझ्याशी आदराने बोला, मी फक्त माझं काम करत आहे. मला सांगितलेल्या ठिकाणी मी वेळेवर पोहोचले आहे. तुम्ही माझ्याशी आदराने बोलाल, तर मीही तुमच्याशी आदरानेच बोलेन." तापसीने पुढं म्हटलं, “कॅमेरा माझ्याकडे आहे, त्यामुळे फक्त माझी बाजू पाहिली जात आहे. एकदा तुमच्याकडे कॅमेरा फिरवला तर समजलं असतं की, तुम्ही माझ्याशी कशाप्रकारे बोलत आहात." असा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चा विषय बनला आहे.
First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Video viral

पुढील बातम्या