'इतिहास हमसे लिखा जाएगा...' एकदा Sye Raa Narasimha Reddy चा टीझर पाहाच

बाहुबली सिनेमानंतर मल्टिस्टारर सिनेमा म्हणून Sye Raa Narasimha Reddy कडून प्रेक्षकांच्या तुफान अपेक्षा आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 04:41 PM IST

'इतिहास हमसे लिखा जाएगा...' एकदा Sye Raa Narasimha Reddy चा टीझर पाहाच

मुंबई, 20 ऑगस्ट- बाहुबली सिनेमातून इतिहास घडवल्यानंतर आता अजून एक दाक्षिणात्य मल्टीस्टारर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी स्टारर सेरा नरसिंहा रेड्डी या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हा एक एतिहासिक ड्रामा असल्याचं स्पष्ट दिसतं. या सिनेमात चिरंजीवी यांच्यासोबत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि भोजपुरी सुपरस्टार रवी किशनही आहेत. त्यामुळेच या सिनेमाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

हा सिनेमा उय्यालावादा नरसिम्हा या योद्ध्याची गोष्ट सांगतो. या योद्ध्याने इंग्रजांविरुद्ध सर्वात आधी लढाई सुरू केली होती. सिनेमात अमिताभ यांनी नरसिम्हाच्या गुरुची भूमिका साकारली आहे. प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखांची झलक दाखवली आहे. नरसिम्हाच्या व्यक्तिरेखेत चिरंजीवी फार उठावदार दिसतात यात काही शंका नाही. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार असून फरहान अख्तर आणि रितेश सिघवानी यांच्या एक्सेल एण्टरटेनमेन्ट आणि अनिल थडानीची एए फिल्म प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे.

येत्या 2 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या मल्टिस्टारर सिनेमासोबत यश राज बॅनरचा वॉर सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. वॉरमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची मुख्य भूमिका आहे. या दोन मेगा सिनेमांशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया स्टारर मरजावां सिनेमाही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. याचा अर्थ 2 ऑक्टोबरला एक दोन नव्हे तर तब्बल तीन बिग बजेट सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

Man vs Wild मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला रेकॉर्ड

Loading...

...अखेर त्या अफेअरबद्दल बोलला केएल राहुल

इंटरनेटवर लीक झालेत या अभिनेत्याचे सेक्स सीन

अखेर करण जोहरने सांगितलं त्या Drugs Party चं सत्य

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचं निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...