तब्बल 7 वर्षांनी चाॅकलेट बाॅय वळला छोट्या पडद्याकडे!

स्वप्नील जोशी म्हणतो, आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय.

  • Share this:

दिग्दर्शक सतीश राजवाडेनं स्टार प्रवाहची कमान हाती घेतली. सतीश या चॅनेल्सचा प्रोग्रॅमिंग हेड झाला तेव्हापासून चॅनेलमध्ये बरेच बदल झाले. त्यातलाच एक म्हणजे 7 वर्षांनी स्वप्नील जोशी आणि 9 वर्षांनी सिद्धार्थ चांदेकर मालिकांकडे वळले.

स्वप्नील जोशी , सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या भूमिका असलेली जीवलगा मालिका सुरू होतेय. जो डोळे बंद केल्यावरही दिसतो तो जीवलगा अशी मालिकेची कॅचलाइन आहे.

‘जिवलगा’मध्ये नातेसंबंधांचे अनेक पैलू उलगडत गेलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मानवी स्वभाव आणि त्यात दाखवलेली प्रगल्भता, विचार करण्याची पद्धत यांची एक वेगळी शैली या कथेतून पुढे येणार आहे.

आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांबद्दलचे आपले अंदाज चुकतात. याचा गोष्टींवर ही कथा प्रकाश टाकते. प्रेमामध्ये काय ताकद असते, हेसुद्धा या कथेतून अधोरेखित होतं.

स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, 'मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही ते कमवायला लागतं यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.'

या मालिकेत स्वप्नील आणि अमृता खानविलकर यांची केमिस्ट्री रंगणार आहे. अमृताही पहिल्यांदाच मराठी मालिकेत काम करतेय. सिद्धार्थ चांदेकरनं अग्निहोत्र मालिकेत काम केलं होतं. ती त्याची पहिली मालिका होती. आता 9 वर्षांनी पुन्हा एकदा सिद्धार्थ मालिका करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 26, 2019 04:53 PM IST

ताज्या बातम्या