मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Marathi Actress : लतिका नंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला दुखापत; झालीय अशी अवस्था

Marathi Actress : लतिका नंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाला दुखापत; झालीय अशी अवस्था

अन्विता फलटणकर

अन्विता फलटणकर

अभिनेत्री अक्षया नाईकनंतर आणखी एका अभिनेत्रीनं तिच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे.

  मुंबई,  22 सप्टेंबर : कलाकार सातत्यानं काम करत असतात. अनेकदा घाई गडबडीत त्यांना काम करावं लागलं. अनेक कलाकार लांबचा प्रवास करून दररोज शुटींगला जात असतात. शुटींगच्या वेळी आपला जीव सांभाळून काम करावं लागतं. शुटींगमध्ये काही दुखापत झाली तर कलाकारांसह संपूर्ण टीमला महागात पडतं. असाच एका प्रसंग घडला होता तो म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या लतीच्या बाबतीत. अक्षयाच्या पायाला दुखापत झाल्यानं तिनं काही दिवस विश्रांती घेतली होती. तर अनेक दिवस दुखऱ्या पायानं सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचं मोठ्या जिद्दीनं शुटींग करत होती. अक्षया आता बऱ्यापैकी चांगली झाली आहे. तर आता दुसरीकडे आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायालाही दुखापत झाली आहे. झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सर्वांची लाडकी स्वीटू म्हणजेच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिच्या पायालाही दुखापत झाली आहे. दुखापत नेहमी कशामुळे झाली हे काही तिनं सांगितलेलं नाही.  अन्विताच्या गुडघ्याला दुखापत झाली असून ती सध्या तिच्या घरी विश्रांती घेत आहे. अभिनेत्रीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिच्या उजव्या पायाला  पट्टा लावला आहे. इन्जुरी असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष कौतुक म्हणजे पायाला दुखापत झालेली असतानाही अन्विताचा उत्साह काही कमी झालेला नाही. हेही वाचा - TRP Alert : असं काय घडलं की अरुंधती दीपावर भारी पडली चिमुकली स्वरा? या आठवड्याचा टीआरपी चार्ट आला समोर
  अभिनेत्री अन्विता फलटणकर व्हिडीओमध्ये ट्रेडिंग गाण्यावर दुखऱ्या पायासह बेडवर बसून डान्स करतेय. डान्स थेरपी असा हॅसटॅग अन्वितानं शेअर केला आहे. अन्विताच्या पायाला झालेली दुखापत पाहून अनेकांनी चिंता वक्त केली आहे.  अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं 'डार्लिंग काळजी घे' असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत प्रेम व्यक्त केलं आहे. अन्विताच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचं झालं तर अन्विता येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून स्वीटू म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. स्वीटू आणि ओम यांची जोडी हीट झाली होती. त्याचप्रमाणे अन्विता नुकतीच टाइमपास 3 मध्ये दिसली होती.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या