• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार 'हे' ज्येष्ठ अभिनेते

'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार 'हे' ज्येष्ठ अभिनेते

स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर (yatin karyekar )हे औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 • Share this:
  मुंबई,2 नोव्हेंबर- मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' (Swarajya Saudamini Tararani) या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या मालिकेची प्रेक्षक अतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर (yatin karyekar )हे औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सोनी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय यतीन कार्येकर यांनी केला आहे. इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
  गेल्या काही वर्षांमध्ये छोट्या पडद्यावर अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मालिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक, पौराणिक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जीजामाता यांसारख्या अनेक थोर, शूरवीरांच्या कथा आतापर्यंत उलगडण्यात आल्या आहेत. यामध्येच भर घालत स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आपल्या भेटीला येणार आहे. वाचा : घटस्फोटानंतर महिनाभरातच समंथाने दिली Good News! सध्या काय करतेय अभिनेत्री? डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मिती 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेच्या माध्यमातून स्वराज्य अबाधित राखून ठेवण्यासाठी झटणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. अलिकडेच या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तब्बल 400जणींचं ऑडिशन घेण्यात आलं होतं. ही भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे. वाचा : Sooryavanshi: अक्षय कुमार-रोहित शेट्टीनं रिक्रिएट केला 'जय-वीरू' सीन..... छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या अपरिचित जाज्वल्य इतिहासाचे पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत उलगडणार आहे. येत्या 15 नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: