मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेता संग्राम समेळ 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत साकराणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका!

अभिनेता संग्राम समेळ 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिकेत साकराणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका!

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या  मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel )राजाराम महाराजांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel )राजाराम महाराजांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel )राजाराम महाराजांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 6 नोव्हेंबर- सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत कोणते कलाकार भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel )राजाराम महाराजांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ अशी ताराराणींची निष्ठा होती. करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. यात स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्यामुळे आता स्वरदा ही ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच राजाराम महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता लागली होती. आता त्यावरून देखील पडद्या उठला आहे. आता राजाराम महराजांच्या भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.

वाचा : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये 'हे' असणार नवे नट्टू काका! पाहा व्हायरल फोटो

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील ‘समीर’ या व्यक्तीरेखेतून संग्राम महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. संग्रामने ‘ललित 205’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून तर ‘विकी वेलिंगकर’, ‘स्वीटी सातारकर’, ‘ब्रेव हार्ट’ (जिद्द जगण्याची) या चित्रपटांत काम केले आहे. त्याचबरोबर ‘एकच प्याला’ या नाटकामध्येही काम केले आहे.

वाचा : 'राणा दा'च्या घरी नवीन मालकीणबाईंची एंट्री, उत्साहात केलं स्वागत

अभिनेता संग्राम समेळने श्रद्धा फाटक हिच्याशी काही दिवसापूर्वी लग्नगाठ बांधली आहे. श्रद्धा ही एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. संग्राम आणि श्रद्धाचा हा विवाह सोहळा काही खास नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत इचलकरंजी याठिकाणी पार पडला. दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे, याआधी संग्रामने 2016मध्ये ‘रुंजी’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी विवाह केला होता.

First published: