मुंबई, 9 नोव्हेंबर- सोनी मराठीवरील आगामी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेचा सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेत कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ ( sangram samel ) छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकताच या मालिकेतील छत्रपती राजाराम राजे यांचा फर्स्ट लुक समोर आला आहे. चाहत्यांनी देखील या लुकला चांगलीच पसंती दिली आहे.
सोनी मराठी वाहिनीने इन्स्टावर राजाराम महाराजांचा फर्स्ट लुक शेअर करत म्हटलं आहे की, स्वराज्याचे तिसरे छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर ज्यांनी स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली ते छत्रपती राजाराम राजे.
वाचा :Bigg Boss Marathi: मीरा-स्नेहामध्ये पुन्हा जोरदार राडा; 'तळ्यात मळ्यात' टास्कने
राजाराम महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता लागली होती. आता त्यावरून देखील पडद्या उठला आहे. राजाराम महराजांच्या भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ याचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांना देखील हा लुक आवडलेला आहे. आता मालिका पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे व या लुकची चर्चा देखील रंगलेली आहे.
View this post on Instagram
‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ अशी ताराराणींची निष्ठा होती. करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. यात स्वरदा ठिगळे या अभिनेत्रीची निवड करण्यात आली. त्यामुळे आता स्वरदा ही ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे.
वाचा : राम गोपाल वर्मांच्या 'Ladaki'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्डनेससोबत अॅक्शनचा
डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.