मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'साक्षात रणरागिणी! स्वरदाने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला आणि... ' डॉ. अमोल कोल्हेंचा VIDEO

'साक्षात रणरागिणी! स्वरदाने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला आणि... ' डॉ. अमोल कोल्हेंचा VIDEO

 सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिका नुकतीच सुरू झाली आहे.मालिकेच्या निर्माते डॉ. अमोल कोल्हे  (dr amol kolhe)  यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत स्वरदाच्या कामाचे कौतुक केले आहे.

सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिका नुकतीच सुरू झाली आहे.मालिकेच्या निर्माते डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत स्वरदाच्या कामाचे कौतुक केले आहे.

सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिका नुकतीच सुरू झाली आहे.मालिकेच्या निर्माते डॉ. अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत स्वरदाच्या कामाचे कौतुक केले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 17 नोव्हेंबर- सोनी मराठीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिका नुकतीच सुरू झाली आहे. ‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ अशी ताराराणींची निष्ठा होती. करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. त्यामुळेच या भूमिकेसाठी अत्यंत कठीण अशा ऑडिशन्स घेण्यात आल्या. राज्यभरातून तब्बल चारशे ऑडिशन्समधून, ज्यात अनेक नामवंत ते नवोदित अभिनेत्री आवर्जून सहभागी झाल्या होत्या. यात स्वरदा ठिगळे (swarda thigale) या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. मालिकेत स्वरदा ही ताराराणींची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

या मालिकेतील एक अवघड सीन कसा शूट करण्यात आला याबद्दल माहिती अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचे दर्शन यातून होते. अनेकदा असे सीन्स करताना डमी वापरतात मात्र स्वरदाने हा सीन स्वत: केला आहे.

वाचा : अंकिता लोखंडेच्या लग्नाची उत्सुकता वाढली; बॅचलर पार्टीचे फोटो झाले VIRAL

मालिकेच्या निर्माते डॉ. अमोल कोल्हे  (dr amol kolhe)  यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट करत स्वरदाच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, एक कृती आणि शंकेची जागा ठाम विश्वासाने घेतली!!:-

"स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेत महाराणी ताराराणी यांची भूमिका स्वरदा ठिगळे यांनी साकारण्याचा निर्णय झाला तरीही मन साशंक होतं कारण या मालिकेच्या निमित्ताने महाराणी ताराराणी साहेबांच्या पराक्रमी इतिहासाबाबत गेल्या 300 वर्षांची उपेक्षा, मळभ दूर करण्याचं आव्हान समोर असणार आहे आणि म्हणूनच ती भूमिका साकारणारी अभिनेत्री सर्वस्व झोकून काम करणारी हवी हे स्वाभाविक आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

स्वार घोड्याच्या पाठीवर बसून घोडा दोन पायांवर उभा करणे ही प्रतिमा अनेक चित्र, पुतळे यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वैशिष्ट्य झाली आहे..आणि साहजिकच ऐतिहासिक चित्रपट, मालिका यात याची आवर्जून मागणी असते. परंतु अशा शूटिंगचा माझा वैयक्तिक अनुभव भीतीदायक होता.. खाली पडलेला स्टंटमन आणि त्याच्या छातीवर पाय ठेवलेला घोडा हे चित्र अनेक वर्षे डोळ्यासमोरून जात नव्हतं. पुढे माझाही हाच प्रसंग शूट करताना गंभीर अपघात होता होता वाचला. म्हणूनच स्वरदाने हा स्टंट करण्याविषयी मी साशंक होतो. पण कलाकाराने भूमिकेला भिडायचं ठरवलं की यश आपोआप चालून येतं याचा प्रत्यय हा स्टंट पाहिल्यावर येतं. स्वरदा ने घोडा दोन पायांवर लीलया उभा केला आणि डोळ्यासमोर रणरागिणी, स्वराज्य सौदामिनी ताराराणी साहेब उभ्या राहिल्या!

वाचा : मुंबईत भामट्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीची पर्स हिसकावली; झटापटीत Actress जखमी

डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. स्वराज्य सौदामिनी ताराराणी सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता सोनी मराठी वर लागते.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials