'आई म्हणते शिवी देणं वाईट असतं', स्वरा भास्करनं ट्रोलर्सना सुनावलं

'आई म्हणते शिवी देणं वाईट असतं', स्वरा भास्करनं ट्रोलर्सना सुनावलं

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका बालकलाकाराला अपशब्द वापरताना दिसली होती.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करला काही दिवसांपूर्वी एका बाल कलाकराला शिवी दिल्यानं ट्रोल करण्यात आलं होतं. स्वरानं एका चॅट शोमध्ये तिच्या स्ट्रगलिंग काळातील अनुभव शेअर करताना एका जाहिरात शूटिंगच्या वेळचा एक प्रसंग सांगितला. त्यावेळी तिच्यासोबत काम करत असलेल्या एका बालकलाकराला तिनं वाईट शब्दांचा वापर केला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अणि त्यानंतर तिच्यावर सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन टीकेची झोड उठली होती. मात्र आता स्वरानं या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वरानं सांगितलं, मी त्या मुलासाठी चॅट शोमध्ये वापरलेले शब्द हे माझं त्यावेळच्या ताण-तणावाचा कारण होतं. कारण तो माझा स्ट्रगलिंगचा काळ होता. मी माझ्या करिअरच्या काळात कोणालाही त्रास दिलेला नाही किंवा कोणत्याही बालकलाकराशी वाईट वागललेले नाही. मी लहान मुलांची नेहमीच काळजी घेतली आहे. मला लहान मुलं खूप आवडतात. त्या शोमध्ये त्या बालकलाकारासाठी वापरलेला सैतान हा शब्द फक्त विनोदाचा भाग होता. मी त्या मुलाशी अजिबात वाईट वागलेले नाही.

रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचं 'हे' नवं गाणं एकदा ऐकाच, YouTube हंगामा

नुकत्याच देशभरात पार पडलेल्या बालदिनानिमित्त सर्वच कलाकारांनी आपल्या बालपणीचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. यात स्वरा भास्करचाही समावेश होता. स्वरानं तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. तिनं लिहिलं, ‘बालपणीची सर्वात मोठी आठवण म्हणजे आई म्हणायची शिवी देणं ही वाईट गोष्ट असते. मला हे आता समजलं. सर्व लहान मुलांना प्रेम आणि आदर. May u grow up & not become zaroorat se zyada ch**** adults. I meant “chatur” Aapne kya socha?

टीप: प्रिय ट्रोलर्स, हा सुद्धा एक विनोद होता.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका बालकलाकाराबद्दल बोलताना दिसत होती. या मुलाबद्दल बोलताना स्वरानं अपशब्द वापरल्याचं दिसलं. हा किस्सा स्वराच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातला आहे. त्यावेळी ती जाहीरातींसाठी काम करत असे. यावेळी अशाच एका जाहीरातीच्या शूटिंगच्या वेळी स्वराला एका 4 वर्षाच्या लहान मुलानं आंटी म्हटलं होतं. ज्यामुळे तिला त्याचा खूप राग आला होता.

लोकांना वाटतं मी अजुनही 'पॉर्न' इंडस्ट्रीत काम करते, पण मिया म्हणते...

रणवीर सिंगच्या या अभिनेत्रीने बिकिनीवर लिहिलं 'हरे राम', मग झालं असं काही...

=====================================================

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: November 15, 2019, 9:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading