मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वरा भास्करने लग्नाविषयी घेतला मोठा निर्णय; म्हणाली, 'केवळ मुलांसाठी करणार...'

स्वरा भास्करने लग्नाविषयी घेतला मोठा निर्णय; म्हणाली, 'केवळ मुलांसाठी करणार...'

स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही बॉलीवूड स्टार्सपैकी एक अशी कलाकार आहे जी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करण्यास कधीही कचरत नाही. आता लग्न आणि मूल याविषयी तिनं मत मांडले आहे.

    मुंबई, 24 डिसेंबर- स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही बॉलीवूड स्टार्सपैकी एक अशी कलाकार आहे जी वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त करण्यास कधीही कचरत नाही. गेल्या काही काळापासून स्वरा मुलं दत्तक घेण्याच्या तिच्या निर्णयामुळे चर्चेत होती. तिने अलीकडेच तिचा सिंगल मदर होण्याचा निर्णय जाहीर केला. आता तिने लग्नाबाबतही(Swara Bhasker Marriage Plan) आपले मत मांडले आहे. केवळ मुलासाठी लग्न करायचे नाही, असे स्वरा भास्करचे म्हणणे आहे. ईटाईम्सशी केलेल्या संभाषणात स्वराने नातेसंबंधांवर आपले मत मांडले. 33 वर्षीय स्वरा म्हणते की, तिला फक्त तिच्या मुलासाठी कोणासोबत सेटल व्हायचे नाही. तिचा विश्वास आहे की मुलासाठी आई-वडील दोघेही आवश्यक आहेत, पण दोघांचेही एकमेकांवर प्रेम असेल तरच हे घडायला हवे. अन्यथा मुले विभाजीत कुटुंबात वाढतील, याची भीती स्वराला वाटते. तसेच भारतात सिंगल पॅरेंट असणं तितकं अवघड नाही, कारण इथे मुलांसाठी आजी-आजोबा, काका-काकू अशी अनेक नाती असतात आणि मुले त्यांच्यासोबत मोठी होतात. वाचा-कोरोना पॉझिटिव्ह करीनाच्या Omicron रिपोर्टमधून ही माहिती आली समोर स्वरा पुढे म्हणते- 'म्हणूनच मला या गोष्टीची भीती वाटत नाही, की मला मुलं व्हायची असतील तर मला सेटल व्हायला हवं. मी ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याच्याशी केवळ मूल हवे म्हणून मी तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे ते माझ्या मनात नाही. वाचा-'आई कुठे काय करते'मधील जुना Video पाहून अरुंधतीला आलं भरून स्वरा पुढे म्हणाली की, तिला एक मूल हवे आहे, हा तिचा निर्णय पक्का होता. दत्तक घेणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे, परंतु, त्यात तिला कोणतीही अडचण नसल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, स्वरा भास्करने आधीच मूल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला आहे. स्वरा सध्या अविवाहित आहे, पण तिला आई होण्याची इच्छा आहे. त्यामुळेच तिनं मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या