मुंबई, 12ऑक्टोबर:बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) तिच्या बेधडक वागण्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अनेकवेळा तिला यामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. स्वरा आता पुन्हा एकदा एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. स्वराने ट्रोलिंगला कंटाळून एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने एका सोशल मीडिया इंफ्लुएंसर आणि यूट्यूबरच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे. यूट्यूबर एल्विश यादव (Youtuber Elvish Yadav) याच्या विरूद्ध दिल्लीतील वसंत कुंजमध्ये तक्रार दाखळ केली आहे. यूट्यूबर एल्विश यादवने माझी प्रतिमा, प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप स्वराने केला आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासीठी स्वरा सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात गेली होती.
स्वराचे याप्रकरणी म्हणे आहे की, या यूट्यूबरने तिच्या ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमातील सीनचा वापर करून तिची फक्त इमेज खराब केलेली नाही तर सोशल मीडियावर देखील तिच्या विरूद्ध काही हॅशटॅग ट्रेंड केले आहेत. यामुळे समाजातील तिची प्रतिष्ठ मलीन झाली आहे त्यामुळेच स्वारने हे पाऊल उचलेले आहे असे सांगितले आहे.
वाचा : Into the Wild Trailer: शार्क समोर आला तर... बचावासाठी Bear Gryllsने दिला अजय देवगणला हा सल्ला
एफआयआरमध्ये स्वरा भास्करने आयटी IPC कलम -354 D (पाठलाग करणे), आयपीसी कलम -509 आणि IT अधिनियम कलम 67 (इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अश्लील साहित्य प्रकाशित करणे) अंतर्गत यूट्यूबरवर आरोप केले आहेत.
A film actress filed a complaint alleging that a Twitter user & YouTube influencer has been circulating some messages on social media platforms with the intention of outraging her modesty and some hashtags have also been circulated regarding some movie scenes: Delhi Police (1/2)
— ANI (@ANI) October 10, 2021
स्वराच्या तक्रारीनंतर YouTuber ने एक पोस्टही शेअर केरत म्हटले आहे की, स्वरा भास्करने त्याच्यावर चूकीचे आणि खोटे आरोप लावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.