अभिनेत्री स्वरा भास्करलाही लैंगिक शोषणाचा फटका

अभिनेत्री स्वरा भास्करलाही लैंगिक शोषणाचा फटका

बॉलिवूडमध्ये नवीन असताना सेक्श्युअल फेवर द्यायला नकार दिल्याने अनेक भूमिका हातच्या गमावल्या असल्याचं तिने सांगितलं.

  • Share this:

08 नोव्हेंबर : महिला अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा बॉलिवूडमध्ये गाजत असताना अभिनेत्री स्वरा भास्करनेही आपल्याला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं असल्याचं सांगितलंय. बॉलिवूडमध्ये नवीन असताना सेक्श्युअल फेवर द्यायला नकार दिल्याने अनेक भूमिका हातच्या गमावल्या असल्याचं तिने सांगितलं.

त्यासोबतच एका सिनेमाचं ५६ दिवस आऊटडोअरला शूटिंग करत असताना दिग्दर्शकाने रात्रंदिवस आपल्याला एसएमएस आणि फोन करून त्रास दिल्याचंही तिने सांगितलंय. मात्र असे प्रसंग आले तरीही आपल्या अटींवर काम करायला तयार असल्यानेच अशा प्रसंगांना बळी पडले नाही असं तिने स्पष्ट केलंय.

लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर 'Me too'चं कँपियन सगळीकडे चाललं. हाॅलिवूडपासून हे कँपियन सुरू झालेलं. बाॅलिवूडमध्ये विद्या बालन सोडता कुठल्याही अभिनेत्रीनं यावर तोंड उघडलं नव्हतं.

स्वरा सध्या 'वीरे दी वेडिंग'चं शूटिंग करतेय.

First published: November 8, 2017, 6:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading