Elec-widget

Bhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान

Bhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान

 वादात अडकण्याची स्वराची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने वादग्रस्त विधानं केली आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, २ सप्टेंबर- आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने भाजप सरकारविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर आनंद साजरा करणारे सत्तेत बसल्याचं वादग्रस्त विधान अभिनेत्री स्वरा भास्करनं केलं आहे. नवी दिल्लीत ती पत्रकारांशी बोलत होती. समाजाबाबत आपलं मत मांडताना तिनं इतिहासातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

Loading...

भीमा- कोरेगाव प्रकरणात पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याच संदर्भात स्वराने हे वक्तव्य केलं. याआधी तिने स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला. यात नव्या भारताचा चेहरा दाखवण्यात आला आहे. यात लिंचिंग करणाऱ्यांची सुटका होते तर कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबले जाते.

वीरे दी वेडिंग या करिना कपूरच्या सिनेमात स्वरा भास्करनं सहअभिनेत्री म्हणून भूमिका केलीय. वादात अडकण्याची स्वराची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा तिने वादग्रस्त विधानं केली आहेत.

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 08:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...