मुंबई, 22 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) कंगना रणौत (Kangana ranaut) आणि काँग्रेसचे आमदार सुखदेव पांसे (Sukhdev Panse) यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगलं आहे. काँग्रेसच्या आमदाराने कंगना रणौतवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. पांसे यांनी कंगनाचं वर्णन 'नाचणारी गाणारी' असं केलं होतं. एवढंच नाही तर, कॉंग्रेसच्या आमदारानेही शेतकरी आंदोलनावरील (Farmer protest) कंगना रणौतच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला होता. यावर प्रतिक्रिया देताना कंगना रणौतनेही सुखदेव पांसे यांना लक्ष्य केलं होतं. तिने एक ट्वीट करत सुखदेव पांसेवर बोचरी टिका केली आहे. आता या संपूर्ण वादात स्वरा भास्करनेही (Swara Bhaskar) उडी घेतली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिने कॉंग्रेसचे आमदार सुखदेव पांसे यांनी कंगनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा आणि कंगनाचा अवमान केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर, स्वराने आपल्या ट्वीटमध्ये कंगनालाही लक्ष्य केलं आहे. कारण, सुखदेव पांसे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने पुन्हा एकदा बॉलीवूड अभिनेत्रींवर टीका केली आहे.
Sukhdev Panse said a stupid, sexist and totally condemnable thing.. Kangana.. you made it worse! 🙈🙈🙈🙈😐😐😐😐 https://t.co/nebnYv3BH1
— Swara Bhasker (@ReallySwara) February 21, 2021
यावेळी सुखदेव पांसे आणि कंगनावर निशाणा साधताना स्वरा भास्करने लिहिलं आहे की 'सुखदेव पांसेचं वक्तव्य मूर्खपणाचं, लिंगभेद करणारं आणि पूर्णपणे निंदनीय आहे. पण कंगनाने या गोष्टीला आणखी वाईट केलं आहे.'
(वाचा-आज ठरणार शर्लिन चोप्राचं भवितव्य; अश्लिल व्हिडीओप्रकरणी जाणार तुरुंगात?)
खरं तर, सुखदेव पांसे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना कंगनाने ट्वीटरवर लिहिलं की, 'हा जो कोणी मुर्ख आहे, त्याला माहित आहे का? की मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने आयटम साँग करण्यास नकार दिला आहे. तसंच कुमार- खान यांसारख्या मोठ्या नायकांसोबत काम करण्यासही मी नकार दिला आहे. ज्यामुळे संपूर्ण बॉलीवूड टोळी माझ्या विरोधात झाली आहे.' स्वरा भास्करने कंगनाचं हे ट्वीट क्वोट करत प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Kangana ranaut