वाढदिवसाचा केक कापताना स्वरा भास्कर झाली भावुर; रडतानाचा VIDEO व्हायरल

वाढदिवसाचा केक कापताना स्वरा भास्कर झाली भावुर; रडतानाचा VIDEO व्हायरल

Swara Bhaskar Birthday: स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिला सरप्राइज दिलं होतं, यामुळे ती खूपच भावनिक झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा आज (9 एप्रिल) वाढदिवस (Swara Bhaskar Birthday) आहे. स्वराच्या वाढदिवशी तिचे चाहते आणि तिचे जवळचे मित्र- मैत्रिणी तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. अशातच स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिला सरप्राइज दिलं होतं, यामुळे ती खूपच भावनिक  झाली आहे. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral Video) होत आहे.

स्वरा भास्करने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, 'माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या पालकांनी आणि माझ्या सोबत काम करणाऱ्या माझ्या मित्रांनी माझा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस अॅडव्हान्समध्ये साजरा केल्यानं मी सरप्राइज झाले. मी या जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती आहे, जिला असा परिवार आणि मित्र मिळाले आहेत. '

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

स्वराच्या वाढदिवशी सोनम कपूरनेही तिला अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमनं शुभेच्छा देताना लिहिलं की, 'प्रिय बहिण, आपण एके दिवशी गप्पा मारल्या आणि असं वाटलं की ही मैत्री देवानं बनवली आहे. तु चित्रपटात साक्षी, बिंदिया आणि चंद्रिका... ज्या काही व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. त्यामध्ये ऑफ स्क्रीन व्यक्तीरेखा माझी सर्वात आवडती आहे. वेळेनुसार तुझा आवाज आणखी बुलंद होवो. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! सोनमची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होतं असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

हे ही वाचा-  पंगा क्वीन कंगनावर पुन्हा भडकली स्वरा भास्कर; अभिनयाचं केलं कौतुक पण...

स्वरा भास्करनेही या पोस्टवर प्रतिक्रिया देत सोनमचे आभार मानले आहे. यावेळी स्वरा म्हणाली की, 'लव यू सो मच सोनम, तुम बेस्टेस्ट हो।' खरंतर स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विविध राजकीय आणि सामाजिक मुद्यावर टोकदार भाष्य करण्यासाठी स्वराला ओळखलं जातं. ट्विटरवर स्वराला अनेकदा राजकीय झुंडीकडून टार्गेट केलं जातं. पण ती निडरपणे आपली मतं मांडत असते. अलीकडेचं तिने शेतकरी आंदोलना पाठिंबा दिल्यामुळे चर्चेत आली होती. दरम्यान शेतकरी आंदोलनावरून तिचं अभिनेत्री कंगना राणौत सोबतचं चांगलचं शाब्दिक युद्ध पेटलं होतं.

Published by: News18 Desk
First published: April 9, 2021, 3:39 PM IST

ताज्या बातम्या