ब्रेकअपनंतर स्वरा भास्कर पडली 'या' महान अभिनेत्याच्या मुलाच्या प्रेमात

ब्रेकअपनंतर स्वरा भास्कर पडली 'या' महान अभिनेत्याच्या मुलाच्या प्रेमात

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेत कन्हैय्या कुमारचा प्रचार केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेत कन्हैय्या कुमारचा Kanhaiya kumar प्रचार केल्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री स्वरा भास्कर Swara Bhaskar आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडींमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वरा हिमांशू शर्मा या तरुण लेखकाच्या प्रेमात होती. गेली चार -पाच वर्षं ते रिलेशनशिपमध्ये होते. पण स्वरा आणि हिमांशूचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, दिवंगत अभिनेते आणि नाटककार गिरीश कार्नाड Girish karnad यांचा मुलगा रघू कार्नाड याच्याबरोबर स्वरा भास्कर डेटिंग करत असल्याची चर्चा आहे. रघू कार्नाड पुरस्कार विजेता पत्रकार आहे. स्वरा आणि रघू एकमेकांबरोबर अनेक वेळा दिसले आहेत.

स्वरा आणि रघू एकमेकांचे मित्र होते. त्यांची मैत्री आणखी घट्ट होत असल्याची बातमी स्पॉटबॉयने दिली आहे. ते दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल दोघांपैकी कुणीही खुलासा केलेला नाही.

अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!

Yomeddine नावाच्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी स्वरा आणि रघू एकत्र दिसले. त्यानंतर डिनरलाही हे दोघे एकत्र जाताना दिसतात, अशी बातमी आहे.

स्वरा भास्कर तिच्या वेगळ्या भूमिकांमुळे लक्षात राहणारी अभिनेत्री आहे. तिने तिची राजकीय भूमिकाही नेहमीच जाहीरपणे मांडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बेगुसराईमधून निवडणूक लढवणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार कन्हैय्या कुमार यांचा प्रचार स्वरा भास्करने केला होता.

आमिर खानच्या मुलीने शेअर केला हा फोटो, कॅप्शनमुळे सुरू झाली वेगळीच चर्चा

गिरीश कार्नाड यांचीही मतं उजव्या विचारसरणीला विरोध करण्याची होती. त्यांचा मुलगा रघू स्वतः पत्रकार आहे. आता स्वरा आणि रघू यांच्यात वैचारिक पातळीवरही मनं जुळलेली असू शकतात.

------------------------------------------------------------------

VIDEO : राज ठाकरेंची चौकशी कशासाठी आणि काय कोहिनूर प्रकरण?

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 22, 2019, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading