मुंबई,7 एप्रिल- सध्या 'तू तेव्हा तशी'
(Tu Tevha Tashi) ही मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ही मॅच्युअर लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मालिकेतील स्वप्नील जोशी
(Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर
(Shilpa Tulaskar) यांची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. त्यामुळेच ही मालिका आणि यातील कलाकार सतत चर्चेत असतात. परंतु आज एक वेगळ्याच कारणाने हे कलाकार चर्चेत आले आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारे स्वप्नील-शिल्पा यापूर्वीसुद्धा एका मालिकेत झळकले आहेत. परंतु या मालिकेत त्यांनी चक्क आईलेकाची भूमिका साकारली होती.
झी मराठीवर काही दिवसांपासून 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेने सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. मालिकेत साधा-कमी बोलणारा अभिनेता तर दुसरीकडे हजरजबाबी, मनात येईल ते पटकन बोलणारी, बिनधास्त अभिनेत्री अशी ही कथा प्रेक्षकांना फारच आवडली आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर आहे. या दोघांची फ्रेश जोडी सर्वांनाच पसंत पडत आहे.
परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे, की स्वप्नील आणि शिल्पाने यापूर्वीही एका मालिकेत काम केलं आहे. मात्र सध्या मालिकेत लव्हबर्ड्स असणारे हे दोघे, याआधी आई आणि मुलाच्या भूमिकेत दिसून आले आहेत. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. 1999 मध्ये आलेल्या 'हद कर दी' या हिंदी विनोदी मालिकेत स्वप्नील आणि शिल्पा एकत्र दिसले होते. या मालिकेत स्वप्नीलने शिल्पाच्या मुलाची भूमिका साकारली होती.
सध्या 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत दाखविण्यात येत असलेले नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स यामुळे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी सतत उत्सुक असतात. या दोघांची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.