मराठीतल्या या टॉप हिरोनं शेअर केला हा फोटो आणि लिहिलं Keep Guessing

या अभिनेत्यानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेला हा फोटो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 03:49 PM IST

मराठीतल्या या टॉप हिरोनं शेअर केला हा फोटो आणि लिहिलं Keep Guessing

मुंबई, 18 जुलै : स्वप्नील जोशी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘मोगरा फुलला’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. या सिनेमाशिवाय स्वप्निल सध्या स्टार प्रवाहवरील ‘जीवलगा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून त्यानं अनेक वर्षांनंतर पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. स्वप्नील सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आहे. स्वप्नील नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. अनेकदा तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. सध्या त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो स्वतः स्वप्नीलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वप्नील स्त्री वेशात दिसत आहे. यात त्यानं पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. हा फोटो पाहिल्यावर खरं तर तो स्वप्नील आहे यावरही विश्वास बसत नाही. एवढा त्याचा लुक वेगळा आहे. हा फोटो शेअर करताना स्वप्नीलनं त्याला keep Guessing असं कॅप्शन दिलं आहे. तसेच त्यानं ट्विटरवर #SareeTwitter ला सुद्धा हा फोटो टॅग केला आहे. त्यामुळे स्वप्नील नव्या सिनेमाची तयारी करतोय की आणखी काही याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यात त्याच्या कॅप्शनमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

झी मराठीच्या वर्चस्वाला धक्का, कलर्स मराठीची 'ही' मालिका TOP 5मध्ये

स्वप्नील जोशीचा नुकताच रिलीज झालेला मोगरा फुलला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या सिनेमातील स्वप्नीलच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं. सध्या तो ‘जीवलगा’ मालिकेत विश्वासची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून स्वप्नीलनं बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा कमबॅक केलं आहे. सध्या त्याची भूमिका टीव्ही विश्वात खूप गाजत आहे.

ताकद, साहस आणि पराभव न मानणाऱ्या वैज्ञानिकांची कथा, पाहा Mission Mangal Trailer

========================================================

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 03:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...