मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Swapnil Joshi : '30 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही...' गोकुळाष्टमीनिमित्त स्वप्नील जोशीनं सांगितली 'ती' आठवण

Swapnil Joshi : '30 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही...' गोकुळाष्टमीनिमित्त स्वप्नील जोशीनं सांगितली 'ती' आठवण

Swapnil joshi

Swapnil joshi

स्वप्नीलने 1993 साली रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' मालिकेत काम केले आणि स्वप्नीलचे आयुष्य एका रात्रीत बदलले. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत स्वप्नीलने या भूमिकेची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 18 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणजेच स्वप्नील जोशी. गेली अनेक वर्ष आपण त्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना बघत आहोत. स्वप्नीलने बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरु केली होती. एवढ्या वर्षात त्याने विविधांगी भूमिका केल्या आहेत. पण त्याची एक भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरली गेली ती म्हणजे श्रीकृष्णाची भूमिका. प्रसिद्ध दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या  'श्री कृष्णा' मालिकेतील श्रीकृष्णाची भूमिका करून स्वप्नीलने आपल्या अभिनयाचा  ठसा उमटवला. आज जवळजवळ तीस वर्षांनंतरही हि भूमिका अजूनही तेवढीच जिवंत वाटते. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुहूर्त साधत स्वप्नीलने या भूमिकेची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे. स्वप्नील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. विविध फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आज त्याने एक व्हिडीओ शेअर करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या व्हिडिओची खूपच चर्चा होत आहे. हा व्हिडीओ आहे स्वप्निलच्या कृष्ण रुपातला. त्याने हा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि,''30 वर्षांहून अधिक काळ लोटला पण तरीही, ही भूमिका आजही तेवढीच प्रेरणा देते!'
स्वप्निलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'तू आतापर्यंतचा सर्वात  उत्तम श्रीकृष्ण साकारला आहेस', 'My फेवरेट कृष्णा', 'तू आमचं बालपण आनंददायी बनवलं होतस' अशा शब्दात स्वप्निलच्या चाहत्यांनी पोस्टवर कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. हेही वाचा - Baipan Bhaari Deva : केदार शिंदेंच्या नव्या सिनेमात दीपा परबची एंट्री; सांगणार 'तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट' स्वप्नीलने 1993 साली रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' मालिकेत काम केले. स्वप्नील जोशी याने बाळकृष्णाची भूमिका साकारली होती.  त्याने साकारलेला हा कृष्ण आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. रामानंद सागर यांच्या 'उत्तर रामायण' मालिकेत स्वप्नीलने कुशची भूमिका साकारली होती. या मालिकेद्वारेच  त्याने  टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. त्याचा निरागस चेहरा आणि दमदार अभिनय बघून रामानंद सागर यांनी त्याला  'श्री कृष्ण' मालिकेत  कृष्ण बनवण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेतून त्याला लोकांचे खूप प्रेम मिळाले. 'श्री कृष्णा'मध्ये काम केल्यानंतर स्वप्नीलचे आयुष्य एका रात्रीत बदलले. 'श्री कृष्ण' केल्यानंतर स्वप्नील बराच काळ पडद्यापासून दूर राहिला. दरम्यान, त्याने आपल्या अभ्यासात पूर्ण लक्ष दिले. शिक्षण पूर्ण केले आणि पुन्हा चित्रपटसृष्टीत दमदार कमबॅक केले.  आज स्वप्नील मराठी चित्रपटसृष्टीला आघाडीचा अभिनेता आहे.
First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Swapnil joshi

पुढील बातम्या