स्वप्नील जोशीच्या लेकाचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

स्वप्नील जोशीच्या लेकाचा 'हा' व्हिडिओ पाहिलात का?

असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अभिनयाचंही बालकडू घरातून मिळावं लागतं. अनेक अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या मुलांना ते मिळतंच.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अभिनयाचंही बालकडू घरातून मिळावं लागतं. अनेक अभिनेत्यांच्या आणि अभिनेत्रींच्या मुलांना ते मिळतंच. असाच एक तारा उगवणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशीचा मुलगा राघवचं स्क्रीनवर पदार्पण होतंय.

नुकताच इन्स्टाग्रामवर स्वप्नील जोशीनं एक व्हिडिओ टाकलाय. जाॅन्सनच्या जाहिरातीत राघव आपल्या आईबाबांबरोबर दिसणार आहे.  स्वप्नील आणि लीना यांना मायरा आणि राघव अशी दोन मुलं आहेत. मायराचा जन्म २३ मे २०१६ रोजी झाला तर राघवचा जन्म ७ डिसेंबर २०१७ला झाला आहे.

मराठी इंडस्ट्रीतला हा सुपरस्टार घरी आपल्या मुलांचा लाडका बाबाच असतो. स्वप्नील राघवला रोज स्वत: न्हाऊमाखू घालतो. त्या व्हिडिओत स्वप्नीलनं राघवच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी शेअर केल्यात. राघवही या शूटमध्ये एंजाॅय करताना दिसत होता.

 

View this post on Instagram

 

I've always been a very hands on dad. For both my kids I've wanted to use the gentlest things. That's why I was so happy to hear about the all New Johnson's! They've changed their entire range of products inside out. We've been using Johnsons on Raghav from day one, and our most favorite products are their Top to Toe Wash and their Baby Lotion, ideal for newborns. What really appeals to us is that they are free of allergens and free of harmful chemicals. And most importantly I was very glad to know that all their products are tested with over 5.5 lac people globally meet the top regulatory standards. This is what makes the New Johnson's truly gentle. We will always #CHOOSEgentle for Raghav @johnsonsbabyindia मला नेहमीच माझ्या दोन्ही मुलांच्या स्किन केयरसाठी सौम्य गोष्टीचा वापर करायचा होता. नुकतच “न्यू जॉन्सन" च्या प्रोडक्टबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्ही पहिल्या दिवसापासूनच राघवसाठी टाॅप टू टो वाॅश आणि बेबी लोशन हे प्रोडक्ट वापरत आलो आहोत आणि अर्थातच त्यांच्या संपूर्ण प्रॉडक्टची श्रेणी उत्तम असल्यामुळे तसेच जॉन्सन चे सगळे प्रोडक्ट हे हानीकारक रसायनांपासून मुक्त असल्यामुळे 5.5 लाख लोक जागतिक स्तरावर याचा वापर करतात. हेच ‘न्यू जॉन्सन’ च्या प्रोडक्टस् ला पूर्णतः अग्रगण्य सिद्ध करत असल्याने आम्ही देखील राघवसाठी @johnsonsbabyindia चीच निवड केली.

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi) on

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबई-पुणे मुंबईचे दोन्ही भाग हिट झाले होते. 'मुंबई पुणे मुंबई' या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली.

या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता.  या सिनेमाच्या सीरिजमधल्या तिसऱ्या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.

Birthday Special : जेव्हा आमिरच्या सिनेमातून अक्षयला बाहेर काढलं होतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2018 02:59 PM IST

ताज्या बातम्या