Home /News /entertainment /

Swapnil Joshi: सगळीकडे गुवाहाटीच्या हाटेलची हवा पण स्वप्नीलला सुरतलाच जायचं बुवा!

Swapnil Joshi: सगळीकडे गुवाहाटीच्या हाटेलची हवा पण स्वप्नीलला सुरतलाच जायचं बुवा!

अभिनेता स्वप्नील जोशी सध्या टीव्ही मालिकेतल्या भूमिकेमुळे बराच प्रसिद्ध होत आहे. त्याच्या नव्या रीलमुळे अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडताना दिसत आहेत.

  मुंबई 28 जून: झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) मालिकेतून अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) बऱ्याच काळानंतर टीव्ही मालिकेत कमबॅक केलं आहे. या मालिकेतील त्याचं सौरभ पटवर्धन हे पात्र फारच पसंत केलं जात आहे. मालिकेचा सध्याचा ट्रॅक काहीसा दुःखद चालू आहे कारण कदाचित सौरभ आणि अनामिक यांच्या वाटा वेगळ्या होण्याची वेळ आली आहे असं काहीसं चित्र दिसत आहे. पण ऑफ स्क्रीन मात्र स्वप्नील धमाल करतोय. त्याच्या एका नव्या रीलची तुफान चर्चा होताना दिसत आहे. वणीला शोधलं मीडियावर (Swapnil Joshi instagram) प्रचंड ऍक्टिव्ह असतो. ऑन स्क्रीन पट्या होऊन तो चॅन सीन करतो आणि ऑफ स्क्रीन सेटवरच्या कलाकारांसोबत धमाल करताना दिसतो. त्याचे धमाल विनोदी रील तर प्रचंड प्रसिद्ध होत असतात. नुकतंच त्याने एक रील शेअर केलं आहे. स्वप्नील या तुफान कॉमेडी रीलमध्ये कॅमेरात बघून I Love You म्हणताना दिसत आहे. समोरून मुलीचा आवाज येतो आणि ती माजात असं म्हणते ‘सुरत पाहिलीस का?’ त्यावर स्वप्नील म्हणतो नाही फक्त अहमदाबाद पर्यंतच गेलो आहे. या शाब्दिक कोटीचा संबंध सध्याच्या राजकीय परिस्थितीशी सुद्धा जोडला जात आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे जिथे राजकारणात आधी सुरत शहराचं महत्त्व होतं आणि आता गुवाहाटीला महत्त्व प्राप्त होत आहे तिथे स्वप्नीलला सुद्धा सुरतला जायचे वेध लागले का असा भन्नाट गमतीदार प्रश्न विचारला जात आहे. एका युजरने त्याला ‘आता गुवाहाटी म्हणलं असतं तर बेस्ट झालं असतं’ असं सुद्धा म्हणलं आहे.
  एका युजरने ‘बरं झालं सुरत नंतर अहमदाबादला गेलात नाहीतर इथे सुरत via गुवाहाटी अशी परिस्थिती आहे’ असं लिहिलं आहे. एकूणच काय तर अनेकांनी त्याच्या या रीलला आत्ताच्या राजकीय वातावरणाशी जोडून रिलची पुरेपूर मजा घेतली आहे. हे ही वाचा- Nipun Dharmadhikari: चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक निपुणला देतेय एक गोंडस व्यक्ती त्रास, कोण आहे पाहा मालिकेत पट्या अनामिकाला I Love You म्हणताना आणि तिला लग्नाची मागणी सुद्धा घालताना दिसत आहे. मात्र कावेरी आईमुळे या प्लॅनवर पाणी फिरतं आणि पट्या शहर सोडून जायचा निर्णय घेतो. आता यामुळे अनामिका आणि सौरभची खरोखरच ताटातूट होणार का? का काही नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Instagram, Marathi entertainment, Swapnil joshi, Zee marathi serial

  पुढील बातम्या