या वर्षी पुन्हा एकदा स्वप्नील-मुक्ताची जादू बहरणार

या वर्षी पुन्हा एकदा स्वप्नील-मुक्ताची जादू बहरणार

आज या सिनेमाच्या सीरिजमधल्या तिसऱ्या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं.

  • Share this:

मुंबई, 03 आॅगस्ट : 'मुंबई पुणे मुंबई-१' हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो सुपरडुपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग 'मुंबई पुणे मुंबई-२' दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जादू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुंबई-पुणे मुंबईचे दोन्ही भाग हिट झाले होते. 'मुंबई पुणे मुंबई' या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. आज या सिनेमाच्या सीरिजमधल्या तिसऱ्या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं.

आता हीच जादू 7 डिसेंबर 2018ला पुन्हा एकदा अनुभवता येईल. 'मुंबई पुणे मुंबई-३'ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांनी लिहिले आहेत.

हेही वाचा

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या दिग्दर्शकाला अटक,34 कोटींची फसवणूक?

…आणि ऐश्वर्याच्या पुन्हा प्रेमात पडला अभिषेक

सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, "मुंबई पुणे मुंबई'ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. 'मुंबई पुणे मुंबई' हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 05:02 PM IST

ताज्या बातम्या