स्वप्नील जोशीची गाडी जोरात! अवघ्या दोन आठवड्यात कमावले इतके कोटी Swapnil Joshi | Swapnil Joshi Movie | Mogara Phulala |

स्वप्नील जोशीची गाडी जोरात! अवघ्या दोन आठवड्यात कमावले इतके कोटी Swapnil Joshi | Swapnil Joshi Movie | Mogara Phulala |

Swapnil Joshi | Swapnil Joshi Movie | Mogara Phulala | स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता.

  • Share this:

मुंबई, 28 जून- आई-मुलाचे, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणारा तसेच एक कौटुंबिक संदेश देणारा आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला श्राबणी देवधर दिग्दर्शित 'मोगरा फुलला' हा चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा सिनेमा थोड्या दिवसातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने एकूण १ कोटी ४५ लाखांचा गल्ला जमवला होता. चित्रपटाने दुसऱ्या आठवडयातदेखील आपली घौडदौड कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. १७ जून ते २३ जून या दुसऱ्या आठवड्यात एकूण २ कोटी ७२ लाख इतकी कमाई केली आहे.

‘मोगरा फुलला’ सिनेमाला एकूण मिळणारा प्रतिसाद पाहता ठाणे आणि मुंबई येथील थिएटरमधील चित्रपटाच्या शोची संख्या वाढविण्यात आली आहे. यामुळेच सिनेमालादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘मोगरा फुलला’ या सिनेमाची दोन आठवड्यांची एकूण कमाई ४ करोड १७ लाख इतकी झाली आहे.

विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी

या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध

‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाइनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ चित्रपटात स्वप्नील जोशी, सई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद इंगळे, संदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे. नीना कुलकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळते, तर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची 'पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं, नात्यांनी समृद्ध होणं कठीण' या टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.

चित्रपटातील गाणी अभिषेक कणखर यांनी लिहिली असून रोहित राऊतने संगीत दिले आहे. शंकर महादेवन, बेला शेंडे, जसराज जोशी यांच्या आवाजातील गाणी उत्तम जुळून आली आहेत. उत्तम कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, चांगली संकल्पना आणि सुमधुर संगीत यांच्यामुळे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील यात काही शंका नाही.

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

First published: June 28, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading