मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय; केवळ याच गोष्टीसाठी करणार सोशल मीडियाचा वापर

स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय; केवळ याच गोष्टीसाठी करणार सोशल मीडियाचा वापर

त्यानं वेगळ्याच प्रकारे सोशल मीडियाचा (Social media) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ कोरोनाबद्दल (coronavirus) जनजागृती करण्यासाठी यापुढे तो सोशल मीडियाचा वापर करणार आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 26 एप्रिल: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. सुपरहिट चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. लाईव्ह व्हिडीओ, फोटो, विविध प्रकारच्या पोस्ट यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणाचा प्रयत्न करतो. मात्र यापुढे त्यानं वेगळ्याच प्रकारे सोशल मीडियाचा (Social media) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ कोरोनाबद्दल (coronavirus) जनजागृती करण्यासाठी यापुढे तो सोशल मीडियाचा वापर करणार आहे.

स्वप्निलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. (Swapnil Joshi video viral) या व्हिडीओद्वारे त्यानं ही नवी घोषणा केली आहे. यामध्ये तो म्हणाला, “पुढचे काही दिवस मी सोशल मीडियावर माझे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करणार नाही. सोशल मीडियाचा वापर आपण करोनाचं युद्ध जिंकण्यासाठी करायला हवा. त्यामुळे काही दिवस एकतर मी सोशल मीडियावर सक्रिय नसेल किंवा असलो तरी त्या पोस्ट करोना संबंधित असतील. करोनाची माहिती असले. एखाद्याला मदत हवी असेल तर त्याचं आवाहन असेल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मी मनोरंजनाच्या पोस्टसाठी वापरणार नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय.” स्वप्निलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

अवश्य पाहा - क्लोई झाओनं मोडली 92 वर्षांची परंपरा; ऑस्कर पटकावून रचला इतिहास

View this post on Instagram

A post shared by (@swwapnil_joshi)

24 तासांत 2767 मृत्यू

एकीकडे देशात 1 मे पासून व्यापक स्तरावर लसीकरण केलं जाणार असताना दुसरीकडे देशातील करोना दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होऊ लागला आहे. रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 24 तासांत तब्बल 2767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या 1 लाख 92 हजार 311 इतकी झाली आहे. त्यासोबतच 24 तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार 24 तासांत 3 लाख 49 हजार 691 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण 26 लाख 81 हजार 751 अॅक्टिव रुग्ण आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment, Swapnil joshi