मुंबई 19 मार्च: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवर ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘मितवा’, ‘तू हि रे’, ‘दुनियादारी’ यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल आता एक भयपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बळी (Horror Movie Bali) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे.
स्पप्निलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टीझर शेअर करुन या आगामी चित्रपटाची घोषणा केली. त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अत्यंत भीतीदायक अशी दृश्य दाखवण्यात आली आहेत. एक लहान मुलगा एका ओसाड वाड्यात फिरतोय अन् तो एलिझाबेथ नामक एका स्त्रीला आवाज देतोय. दरम्यान एक महिला त्याच्यावर नजर ठेवून आहे. कदाचित तिच एलिझाबेथ असण्याची शक्यता आहे. हा टीझर पाहून तुम्हाला देखील भीती वाटेल.
अवश्य पाहा - या अभिनेत्यानं सुरु केली फाटक्या जीन्सची फॅशन; आज महिलाही करतात फॉलो
या टीझरवर त्यानं “धोका कोणत्याही कोपऱ्यातून होऊ शकतो. एलिझाबेथ कोणत्याही कोपऱ्यातून येऊ शकते. सावध राहा. आता कोण ठरणार तिचा बळी? बळी लवकरच येत आहे.” अशी कॉमेंट लिहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यानं केलं आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार या दोघांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली. हा चित्रपट येत्या 16 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.
अवश्य पाहा - गब्बरला मारताना दिसले होते ठाकूरचे हात; शोलेमधील Video होतोय व्हायरल
View this post on Instagram
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाला, “माझ्या लपाछपी या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परिणामी मी हॉरर जॉनरामध्येच आणखी काम करण्याचा निर्णय घेतला. अन् आती मी बळी हा चित्रपट घेऊन आलोय. अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे. त्याला मराठी प्रेक्षकांकडून नेहमीच चांगले प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की, एक अभिनेता म्हणून स्वप्नीलची प्रतिभा आतापर्यंत म्हणावी तशी वापरली गेली नाही. त्याला भेटल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्याशिवाय तो एक स्टार आहे आणि त्यामुळे आमचा हा चित्रपट सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला मदतसुद्धा होईल. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Horror, Marathi entertainment, Social media viral, Swapnil joshi