VIDEO : स्वप्नील जोशी करतोय सचिनचं स्वागत

VIDEO : स्वप्नील जोशी करतोय सचिनचं स्वागत

सचिन तेंडुलकर अनेकांचा आदर्श आहे. क्रिकेटचा तर तो देव मानला जातो. अभिनेता स्वप्नील जोशीही त्याचा फॅन आहे. तो आणि प्रियदर्शन जाधव सचिनवरचं गाणं म्हणत नाचतायत.

  • Share this:

मुंबई, 05 जानेवारी : सचिन तेंडुलकर अनेकांचा आदर्श आहे. क्रिकेटचा तर तो देव मानला जातो. अभिनेता स्वप्नील जोशीही त्याचा फॅन आहे.  तो आणि प्रियदर्शन जाधव सचिनवरचं गाणं म्हणत नाचतायत.

'मी पण सचिन' हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील 'सचिन पाटील' नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. अशा या प्रेरणादायी चित्रपटातील 'आयला आयला सचिन आयला' हे जोशपूर्ण गाणं नुकतंच  रिलीज झालं आहे.

'आयला आयला सचिन' हे गाणं गावातील बाजारात चित्रित करण्यात आले आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वप्नील आणि प्रियदर्शन या गाण्यात नाचताना आणि गाताना दिसत आहे. बाजारात असलेला गजबजाट आणि या गजबजाटात स्वप्नील 'आयला आयला सचिन' म्हणताना दिसतोय. या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान,मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव,लहान मुले. असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं  चित्रीत  झाले आहे.

'मी पण सचिन' चित्रपटाचे  दिग्दर्शक आणि लेखक श्रेयश जाधव यांनी सांगितले की, "गाण्याचे बोल सचिन, सचिन असल्यामुळे हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा आम्हाला जाणवत होती. सचिन तेंडुलकर खूप मोठे आणि महान खेळाडू आहे. जगभरातील  लोक त्याचे फॅन्स आहे आणि कायम राहातील  सचिन तेंडुलकरांवर असलेल्या प्रेमापोटी,आदरापोटी  त्यांना आमच्या या चित्रपटाकडून आणि  सर्व फॅन्स कडून एक छोटीशी मानवंदना आम्ही देत आहोत".

Exclusive : रणवीरची कोणाला माहीत नसलेली गोष्ट सांगतेय 'गली बाॅय'मधली त्याची आई

ईशा-विक्रांतच्या एका लग्नपत्रिकेची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

साराच्या हातून गेला Coolie No. 1, मिळाला 'या' अभिनेत्रीला

'हा चित्रपट फक्त क्रिकेटवरच आधारित नाहीये. या चित्रपटात क्रिकेट आणि आयुष्य यांना एकाच एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दाखवल्या आहेत', असं मत स्वप्नीलने मांडलं.

First published: January 5, 2019, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading