मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बळी'ची रिलीज डेट OUT; 'समांतर 2' नंतर स्वप्नील जोशी पुन्हा उडवणार थरकाप

'बळी'ची रिलीज डेट OUT; 'समांतर 2' नंतर स्वप्नील जोशी पुन्हा उडवणार थरकाप

 अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर   (Horror Movie)   थ्रिलर चित्रपट‘बळी'  (Bali)  च्‍या जागतिक रीलीजची  (Realese Date)  घोषणा केली आहे. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपटसृष्‍टीमधील लोकप्रिय कलाकार आ स्‍वप्‍नील जोशी   (Swapnil Joshi),   पूजा सावंत   (Pooja Sawant)  व समर्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर (Horror Movie) थ्रिलर चित्रपट‘बळी' (Bali) च्‍या जागतिक रीलीजची (Realese Date) घोषणा केली आहे. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपटसृष्‍टीमधील लोकप्रिय कलाकार आ स्‍वप्‍नील जोशी (Swapnil Joshi), पूजा सावंत (Pooja Sawant) व समर्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर (Horror Movie) थ्रिलर चित्रपट‘बळी' (Bali) च्‍या जागतिक रीलीजची (Realese Date) घोषणा केली आहे. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपटसृष्‍टीमधील लोकप्रिय कलाकार आ स्‍वप्‍नील जोशी (Swapnil Joshi), पूजा सावंत (Pooja Sawant) व समर्थ जाधव यांच्या भूमिका आहेत.

पुढे वाचा ...

 मुंबई, 2 डिसेंबर-   अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज मराठी हॉरर   (Horror Movie)   थ्रिलर चित्रपट‘बळी'  (Bali)  च्‍या जागतिक रीलीजची  (Realese Date)  घोषणा केली आहे. या चित्रपटामध्‍ये मराठी चित्रपटसृष्‍टीमधील लोकप्रिय कलाकार आ स्‍वप्‍नील जोशी   (Swapnil Joshi),   पूजा सावंत   (Pooja Sawant)  व समर्थ जाधव यांच्या भूमिका आहेत. चित्रपटनिर्माता विशाल फ्यूरिया ('लपाछपी' आणि त्‍याचा नुकतेच हिंदी रिमेक अ‍ॅमेझॉन ओरिजिनल मूव्‍ही 'छोरी') यांचे दिग्‍दर्शन आणि अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार यांच्‍या GSEAMS (ग्‍लोबल स्‍पोर्टस् एंटरटेन्‍मेंट अॅण्‍ड मीडिया सोल्‍यूशन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेडद्वारे) निर्मित चित्रपट ‘बळी भारतामध्‍ये आणि जगभरातील २४० हून अधिक देश व प्रदेशांमध्‍ये ९ डिसेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्‍यास सज्‍ज आहे.

चित्रपट ‘बळी विधुर, मध्‍यमवर्गीय वडिल श्रीकांतच्‍या (स्‍वप्‍नील जोशी) जीवनप्रवासाला दाखवतो. त्‍याचा ७ वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्‍कर येऊन पडतो आणि सविस्‍तर निदानासाठी त्‍याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्‍ये नेले जाते. येथून श्रीकांतच्‍या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. स्थितीला रोमांचक वळण मिळते जेव्‍हा मंदार एका रहस्‍यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. तो ती परिचारिका हॉस्पिटलच्‍या पडक्‍या भागामध्‍ये राहत असल्‍याचा दावा करतो.

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या भारतीय कन्‍टेन्‍टचे संपादन प्रमुख मनिष मेंघानी म्‍हणाले. ''प्रेक्षकांनी चित्रपट 'छोरी'वर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहता आम्‍हाला विशाल फ्युरियासोबतचा सहयोग सुरू ठेवण्‍याचा आनंद होत आहे. ते भारतातील हॉरर शैलीला पुनर्परिभाषित करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. स्‍वप्‍नील जोशी, तसेच प्रतिभावान कलाकारांसह‘बळी आमच्‍या झपाट्याने विकसित होणा-या प्रादेशिक भाषा कन्‍टेन्‍ट पोर्टफोलिओमध्‍ये अधिक मूल्‍याची भर करतो.''

दिग्‍दर्शक विशाल फ्युरिया म्‍हणाले, ''हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्‍येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्‍याचा माझा सातत्‍याने प्रयत्‍न राहिला आहे. सर्वोत्तम भयपट म्‍हणजे मनावैज्ञानिकाशी संबंधित चित्रपट, जे वास्‍तविकतेपासून दूर असलेल्‍या पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करतात. आपण जे पाहतो त्‍यावर जितका अधिक विश्‍वास ठेवू, ते तितके अधिक रोमांचक बनत जाते. हेच ‘बळी च्‍या बाबतीत आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत.

मी माझ्या कामावर विश्‍वास ठेवण्‍यासाठी निर्माते अर्जुन व कार्तिक यांचे आभार मानतो. चित्रपट 'छोरी'ला मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर मी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्‍यानंतर या चित्रपटाप्रती प्रेक्षकांच्‍या प्रतिक्रिया जाणून घेण्‍यास उत्‍सुक आहे.'' जीएसईएएमएसचे निर्माते अर्जुन सिंग बराण व कार्तिक डी.निशानदार म्‍हणाले, ''हॉरर शैली प्रेक्षकांचे व्‍यापक प्रमाणात लक्ष वेधून घेते याबाबत कोणतीच संदिग्‍धता नाही. पण कथानक यशस्‍वी होण्‍यासाठी अनेक वास्‍तविकता व अचूकता असणे आवश्‍यक आहे. चित्रपट‘बळी सह आमचा प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम व लक्षवेधक असलेले आधुनिक कन्‍टेन्‍ट सादर करण्‍याचा प्रयत्‍न राहिला आहे. आम्‍हाला आनंद होत आहे की, आम्‍ही या शैलीमध्‍ये निपुण असलेले दिग्‍दर्शक विशाल फ्यूरिया, तसेच स्‍वप्‍नील जोशी व पूजा सावंत यांसारख्‍या प्रतिभावान कलाकारांचे सर्वोत्तम अभिनय असलेल्‍या या कथानकाला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या माध्‍यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत.''

First published:

Tags: Marathi entertainment, Swapnil joshi