आनंदी राहणं हा तुमचा हट्ट असला पाहिजे- स्वप्नील जोशी

आनंदी राहणं हा तुमचा हट्ट असला पाहिजे- स्वप्नील जोशी

स्वप्नील म्हणाला, गौतम-गौरीच्या प्रवासाबरोबर स्वप्नील-मुक्ताचाही प्रवास चालला होता. मी, सतीश, मुक्ता आम्ही तिघं एक युनिट आहोत.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : आज ( 7 डिसेंबर ) बहुचर्चित 'मुंबई पुणे मुंबई 3 ' रिलीज झालाय. स्वप्नील मुक्ताची जोडी सगळ्यांनाच आवडते. पडद्यावर नेहमीच त्यांची केमिस्ट्री खुलून दिसते. पण प्रत्यक्षात त्यांची एकमेकांशी मैत्री आहे का, हे आम्ही जाणून घेतलं.

यावर मुक्ता म्हणाली, एखादा प्रोजेक्ट संपला की आम्ही म्हणजे मी, स्वप्नील, सतीश पुन्हा भेटलो असं काही होत नाही. पण समजा रात्री मला 3वाजता फोन करून कोणाला काही सांगावसं वाटलं, तर हे दोघं असतात. मी त्यांना फोन करू शकते. या मैत्रीत एक सुकुन आहे. आता 9 ते 10 वर्षांनी आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत.

स्वप्नील जोशीलाही मुक्ताचं म्हणणं एकदम पटलं. तो म्हणाला, सतीश आणि मुक्तानं तर एक मालिका केली होती. माझी नंतर ओळख झाली. पण मुक्ता म्हणते ते अगदी बरोबर आहे. गौतम-गौरीच्या प्रवासाबरोबर स्वप्नील-मुक्ताचाही प्रवास चालला होता. मी, सतीश, मुक्ता आम्ही तिघं एक युनिट आहोत. आम्ही एकमेकांची थट्टाही करतो, खेचतो. पण आमची मैत्री घट्ट आहे.

स्वप्नील आणि मुक्ता अनेक वर्ष तसेच छान, प्रसन्न दिसतायत. त्याचं राज काय? यावर स्वप्नील म्हणाला, ' मी दिवसाला 4 ते 5 लीटर पाणी पितो. 8 तास झोपतो आणि आनंदी राहतो. आणि मी तरुण दिसतो याचं कारण माझ्या आजूबाजूची माणसं मला आनंदी ठेवतात. आनंदी राहणं हा तुमचा हट्ट असला पाहिजे.'

स्वप्नीलप्रमाणे मुक्ताही म्हणाली, तुम्ही तुमच्याशी खरं, प्रामाणिक राहिलात तर आनंदी राहणं अवघड नाही. मी जेव्हा काम करते तेव्हा मी जास्त खूश दिसते.

दोघांचं हे सहज असणं आपल्याला त्यांच्या अभिनयातही दिसतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 06:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading