मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Swanandi Tikekar: दिल अभी भरा नही! 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडिओ

Swanandi Tikekar: दिल अभी भरा नही! 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीनं शेअर केला खास व्हिडिओ

 अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनं नव्या व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वानंदी कोणाच्या प्रेमात पडलीय असा प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनं नव्या व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वानंदी कोणाच्या प्रेमात पडलीय असा प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरनं नव्या व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून स्वानंदी कोणाच्या प्रेमात पडलीय असा प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे.

  • Published by:  Minal Gurav
  • मुंबई, 1 ऑगस्ट: दिल दोस्ती दुनियादारी म्हणत प्रेक्षकाच्या मनावर राज्य करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या सुट्ट्यांच्या आनंद घेत आहे. स्वानंदी सोशल मीडियावर बऱ्यांपैकी सक्रीय असते. तिच्या सहज सुंदर अभिनयानं ती प्रेक्षकांची मनं जिंकते. भर पावसाळ्यात स्वानंदी निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली आहे. स्वानंदी नेमकी कुठे गेली आहे हे मात्र तिनं सांगितलेलं नसलं तरी तिच्या पावसाळी ट्रिपमध्ये ती प्रचंड खुश असून निसर्गाचा मनमुदार आनंद घेताना दिसत आहे. स्वानंदीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती 'ये दिल अभी भरा नही', असं म्हणताना दिसत आहे.  तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
अभिनेत्री आणि उत्तम गायिका असलेली स्वानंदी टिकेकरनं महाराष्ट्रातील एक सुंदर ठिकाणाला भेट दिली. स्वानंदीच्या आजुबाजूला सुंदर निसर्ग आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसत आहेत. पावसामुळे हिरवागार झालेला निसर्ग स्वानंदीसाठी खास ठरला आहे. भर पावसात रंगेबीरंगी छत्री घेऊन स्वानंदी पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतेय. तिच्या व्हिडीओमागे 'अभी ना जाओ छोड कर', हे गाणं वाजताना दिसत आहे. हे गाणं स्वानंदीचं सर्वांत आवडतं गाणं आहे. पोस्ट शेअर करत स्वानंदी फेव्ह साँग असा हॅशटॅगही वापरला आहे. हेही वाचा - Kunjika Kalvit: अभिनेत्री कुंजिकानं स्वत:च्या हातानं कशी घडवली बाप्पाची सुंदर मुर्ती; पाहा VIDEO स्वानंदीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर स्वानंदीनं नुकतंच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत एंट्री घेतली आहे. मालिकेत स्वानंदीची एंट्री झाल्यानं मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. तिच्या एंट्रीमुळे लतिका आणि अभिमन्यूच्या आयुष्यात नवे बदल घडले आहेत.
त्याचप्रमाणे स्वानंदी मधल्या काळात एक उत्तम सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीमध्ये स्वानंदी सूत्रसंचालिका म्हणून दिसली होती. मोठ्या ब्रेकनंतर स्वानंदीला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहून तिच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत एंट्री केल्यानंतर काही दिवसातच स्वानंदीनं तिची नवी कार खरेदी केली. कारचा फोटो शेअर करत तिनं तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. स्वानंदीनं ब्लॅक कलरची स्कोडा कार खरेदी केली आहे. 'माय ब्यूटी माय बिस्ट', असं म्हणतं स्वानंदीनं तिच्या कारचे क्लासिक फोटो शेअर केले होते.
First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment

पुढील बातम्या