मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Srushti Pagare : स्वामिनीतील छोटी रमा दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Srushti Pagare : स्वामिनीतील छोटी रमा दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Srushti Pagare

Srushti Pagare

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ मालिकेत छोटी रमा साकारून जिने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, 'सूर नवा ध्यास नवा' च्या मंचावरून जिने आपल्या गाण्याने जिने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 9 ऑगस्ट : कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' हि मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील छोट्या रमाबाईंची  भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती. छोटी रमा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सगळयांची लाडकी सृष्टी पगारे. तिने आधी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून आपल्या गाण्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यानंतर स्वामीनी मालिकेत छोट्या रमाबाईंच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला. आता ती पुन्हा नवी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. सृष्टी पगारे कलर्स मराठीवरीलच 'योग योगेश्वर जय शंकर' या मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

'योग योगेश्वर जय शंकर' ही मालिका शंकर महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. या मालिकेत सध्या शंकर महाराजांचं बालपण दाखवलं जात आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली आहे. आपण सध्या श्रावण महिन्यातील  विविध  सण समारंभ, व्रतवैकल्ये साजरे करत अआहोत. त्याप्रमाणे मालिकांमधूनही हे सण समारंभ साजरे केले  जात आहेत.  ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेमध्ये सुद्धा  जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग येणाऱ्या काळात  प्रेक्षकांना पाहायला  मिळणार आहे. ज्यामध्ये या सणांचं महात्म्य शंकर महाराज सांगणार आहेत. याच भागासाठी  मालिकेत एक विशेष एण्ट्री होणार आहे. शंकर महाराजांची बहीण पावनी ही  मालिकेत दिसणार आहे. ती भूमिका सृष्टी पगारे साकारणार आहे.

हेही वाचा -   Ankush chaudhari : अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर; पाहा व्हिडीओ

मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यानुसार पावनी ही एका संकटात सापडली आहे. तिला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शंकर जिवतीची व्रत पूर्ण करण्याचा सल्ला देतो.  त्याच्या आई वडिलांना तो 'बहिणीला वाचवायला हवं' असं सांगतो. पण शंकरला कोणतीही बहीण नसल्याने त्याचे आई वडील चिंतेत पडले आहेत. त्यामुळे आता  पावनी  नक्की कोण आहे आणि शंकर महाराज तिची कशी रक्षा करणार हे सगळं मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागामध्ये बघायला मिळणार आहे.

स्वामिनी मालिकेनंतर सृष्टी पहिल्यांदाच एका नवीन भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिला पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे हे नक्की. तसेच याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, “मी या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि ही मालिका नक्की बघा”. असा संदेश तिने प्रेक्षकांना दिला आहे.

First published:

Tags: Colors marathi