डॉ. मनमोहन सिंगांवरच्या सिनेमात सुझान बरनर्ट साकारणार सोनियांची भूमिका

डॉ. मनमोहन सिंगांवरच्या सिनेमात सुझान बरनर्ट साकारणार सोनियांची भूमिका

त्यांचे उच्चार आणि एकंदर व्यक्तिमत्त्व सोनिया गांधींशी मिळतंजुळतं आहे, असं विजय रत्नाकर गुत्ते या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. डॉ. सिंग यांची भूमिका अनुपम खेर करतायेत.

  • Share this:

25 जानेवारी : डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर बनणाऱ्या द अॅक्सिडंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका कोण करणार, याबाबत खूप उत्सुकता होती. आता याचं उत्तर मिळालंय. जर्मन अभिनेत्री सुझान बरनर्ट सोनियाजींची भूमिका करणार आहे.

याआधीही प्रधानमंत्री या टीव्ही शोमध्ये त्यांनी सोनियांची भूमिका साकारली होती. त्यांचे उच्चार आणि एकंदर व्यक्तिमत्त्व सोनिया गांधींशी मिळतंजुळतं आहे, असं विजय रत्नाकर गुत्ते या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. डॉ. सिंग यांची भूमिका अनुपम खेर करतायेत.

डाॅ. मनमोहन सिंग यांचे राजकीय सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आहे. अनुपम खेर नेहमीच काँग्रेसवर टीका करतात. अशात त्यांना मनमोहन सिंगांची भूमिका करायला मिळणं हे त्यांच्यासाठी एक आव्हानच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2018 12:12 PM IST

ताज्या बातम्या