• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेता सुयश टिळकचा झाला अपघात; भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं दिली धडक

अभिनेता सुयश टिळकचा झाला अपघात; भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं दिली धडक

‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याचा अपघात झाला आहे. त्यानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही दुखद बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

 • Share this:
  ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याचा अपघात झाला आहे. त्यानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही दुखद बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्याची ही पोस्ट वाचून चाहते देखील अवाक झाले आहेत. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यानं लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. (Suyash Tilak Accident; he shared emotional post on Social Media) सुयश 28 फेब्रुवारी रोजी आपली गाडी न घेता कॅबने प्रवास करत होता. तो ज्या कॅबनं प्रवास करत होता तिचाच अपघात झाला आहे. रविवारी पहाटे रस्त्यावर धुकं होतं. अंधार आणि धुकं असल्यामुळं चालकाला समोरुन येणाऱ्या गाड्या व्यवस्थित दिसत नव्हत्या. दरम्यान समोर येणाऱ्या ट्रकनं सुयशच्या कॅबला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ज्यामुळं गाडी रस्त्याच्या कडेला उलटून पडली. सुदैवानं चालक आणि सुयश यांपैकी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
  View this post on Instagram

  A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

  अवश्य पाहा - तरुणानं मागितली मदत; सोनू सूद म्हणाला, ‘भारत ते नेपाळ पळत जाशील, अन्...’ अपघात झाल्यानंतर सुयश स्वतः कॅबबाहेर आला त्यानंतर त्याने ड्रायव्हरला देखील बाहेर काढलं. या दुर्घटनेत गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. यावरून हा अपघात किती भयंकर होता याची कल्पना करू शकतो. सुयशच्या अपघाताची माहिती चाहत्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची माहिती दिली. 'देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे', अशी पोस्ट करीत सुयशनं काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published: