मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुयश टिळकनं केला गुपचूप साखरपुडा; Photo शेअर करत दिला सुखद धक्का

सुयश टिळकनं केला गुपचूप साखरपुडा; Photo शेअर करत दिला सुखद धक्का

आयुषीच्या वाढदिवशीच त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

आयुषीच्या वाढदिवशीच त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

आयुषीच्या वाढदिवशीच त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

मुंबई 7 जुलै: का रे दुरावा (Ka Re Durava) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक (Actor Suyash Tilak) याने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. त्याने अभिनेत्री आयुषी भावेसोबत (Ayushi Bhave) साखरपुडा केला आहे. (Suyash Tilak engagement with Ayushi Bhave) आयुषीच्या वाढदिवशीच त्याने साखरपुड्याचे फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

धक्कादायक! दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायराबानू विषयी 'हे' केलं जातयं Search

“माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सुंदर करणारी स्त्री.. हॅपी बर्थडे लव्ह… तुझ्यासोबत माझं आयुष्य परिपूर्ण होतं. तुझ्यासारखी उत्तम जोडीदार मिळाल्याने मी अत्यंत भाग्यवान ठरलो आहे. आमचा साखरपुडा झाला असल्याची घोषणा करताना मला अत्यानंद होत आहे. प्रियजनांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसह आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरु करतोय. कुटुंबीय आणि मित्रांचे हा दिवस खास करण्यासाठी आभार” अशा आशयाच्या दोन पोस्ट शेअर करत त्याने साखरपुड्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच त्याने फोटो देखील शेअर केले आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांता हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानने राखला दिलीप कुमारांचा मान; बालपणीचा ठेवा कायमस्वरूपी जपला

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

कोण आहे आयुषी भावे?

आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती. त्यानंतर तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी सहभागी झाली होती. आयुषी भावे लवकरच मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Love story, Marathi actress, Tv actor