मुंबई, 20ऑक्टोबर- गेली काही महिने मनोरंजनसृष्टीत लग्नाचं वारं वाहात आहे.नुकताच लग्नबेडीत अडकलेल्या कलाकारांच्या लिस्टमध्ये आता अभिनेता सुयश टिळकचासुद्धा(Suyash Tilak) समावेश होणार आहे. काल अभिनेत्याच्या हळदीचे काही फोटो व्हायरल झाले होते. तर आज सुयश आणि आयुषीच्या (Ayushi Bhave) मेहंदीचा व्हिडीओ(Mehandi Function) समोर आला आहे. त्यामुळे चाहते जाम उत्सुक झाले आहेत.
View this post on Instagram
मराठमोळा अभिनेता सुयश टिळक 'तू तिथे मी' मालिकेतून घराघरात पोहोचला होता. या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याच्या खऱ्या आयुष्यातील अदिती कोण असणार याची सर्वांचं उत्सुकता लागली होती. दरम्यान 'तुझ्यात जीव रंगला'फेम अक्षया देवधरसोबतही त्याच नाव जोडलं गेलं होतं. परंतु अभिनेत्याने आपल्या आणि आयुषीच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सुयशने अभिनेत्री आयुषीसोबत गुपचूप आपला साखरपुडा उरकला होता. नंतर स्वतः आयुषीच्या वाढदिवसाला हे फोटो शेअर करत त्याने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
त्यांनतर सुयश आणि आयुषीच्या जोडीची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांच्या केळवणाचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र दोघांनीही आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली नव्हती. मात्र काल अचानक दोघांच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले होते. आणि त्यांनतर २१ ऑक्टोबरला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आज आयुषीच्या मेहंदीचा व्हिडीओ समोर आला आहे. राजश्री मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आयुषीच्या मेहंदीचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आयुषीच्या हातावर भरगच्च सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे. यावेळी आयुषीने पिंक आणि व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
सुयशची ती पोस्ट-
View this post on Instagram
'तुझ्याबरोबर माझे आयुष्य पूर्ण झाले आहे. आणि मी फार भाग्यवान माणूस आहे की मला असा अद्भुत सोबती भेटला आहे… ..शेअर करण्यात आनंद होत आहे, की आम्ही अधिकृतपणे एन्गेज झालो आहोत. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाने,आमचा नवीन प्रवास एकत्र सुरू करत आहोत. माझ्यासाठी हे सर्व खास बनवल्याबद्दल माझ्या सर्व कुटुंबीय आणि मित्रांचे आभार'. अशी सुंदर पोस्ट लिहीत सुयशने आपल्या साखरपुड्याची माहिती दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.