मुंबई, 02 ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) त्याच्या लव्हरिलेशनमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. आता मात्र तो लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात अभिनेत्री आयुषी भावेसोबत (Aayushi Bhave) करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा (Suyash Tilak and Aayushi Bhave engagement photo) झाला होता. सुयशने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता साखरपुड्यानंतर त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. सध्या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम सुरू आहेत. नुकतच दोघांचं केळवण पार पडलं. आयुषी भावेने त्यांच्या केळवणाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'नवीन सुरूवात....' असं लिहिलं आहे. सुयश-आयुषीचे फोटो पाहून त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
हर्षदा खानविलकर आणि इतर काही कलाकार मंडळीनी मिळून या केळवणाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अभिजीत केळकर, संग्राम समळे हे कलाकार देखील उपस्थित होते. या केळवणाच्या कार्यक्रमाला सुयशने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर आयुषी साडी नेसली होती. दोघंही खूप सुंदर दिसत आहेत.
हे वाचा - 'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर धडाक्यात साजरा झाला या दोन कलाकारांचा वाढदिवस; पाहा Photos
काही महिन्यांपूर्वी सुयश आणि आयुषीने साखरपुडा केला होता. त्यानंतर सोशल मीडीयावर पोस्ट करून साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली होती. या दोघांच्या साखरपुडा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. 'माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री. तुझ्याबरोबर माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान कारण माझ्याकडे तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली. सांगण्यास आनंद होतोय, आम्ही ऑफिशिअली एंगेज झालो आहोत. आपल्या सर्व प्रियजनांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही एकत्र नवीन प्रवास सुरू करतोय.' अशी पोस्ट त्यावेळी सुयशने केली होती.
हे वाचा - ही मराठमोळी अभिनेत्री करतेय लग्न; सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
आयुषी भावे ही अभिनेत्री आणि लोकप्रिय डान्सर आहे. युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी भावे दिसली होती. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.