'मला माहित आहे तुझ्याकडून...' मुंबईच्या पहिल्या पावसात सुतापाला आली इरफानची आठवण

'मला माहित आहे तुझ्याकडून...' मुंबईच्या पहिल्या पावसात सुतापाला आली इरफानची आठवण

नुकताच मुंबईत पहिला पाऊस पडला आणि पुन्हा एकदा सुतापानं इरफानच्या आठवणीत इमोशनल पोस्ट शेअर केली.

  • Share this:

मुंबई, 5 जून : आठवणी किती महत्त्वाच्या असतात ते आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते. बॉलिवूड अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापाला सध्या त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत आहे. इरफानच्या निधनाला आता 1 महिना उलटून गेला. मात्र त्याचे कुटुंबीय अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. नुकताच मुंबईत पहिला पाऊस पडला आणि पुन्हा एकदा सुतापानं इरफानच्या आठवणीत इमोशनल पोस्ट शेअर केली.

सुतापा सिकदरला पहिल्या पावसात पतीची आठवण सतावत आहे. तिनं इरफानचे पावसातले काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत पावसाच्या आठवणी ताज्या केल्या. या फोटोंसोबत सुतापानं सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा लिहिली. तिनं लिहिलं, धन्यवाद मी तुझं बोलणं ऐकू शकते... हो मला माहित आहे हे तुझ्याकडून माझ्यासाठी आहे. यानं माझं शरीर आणि आत्म्याला स्पर्श केला. दोन हृदयांच्या मध्ये हा पाऊसच आहे, जो आपल्या दोघांना एकमेकांशी जोडून ठेवत आहे.

भयानक होता सनी लिओनीचा फर्स्ट KISS चा अनुभव, वडिलांनी रंगेहात पकडलं आणि...

या पोस्टसोबत सुतापानं इरफानचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये इरफान नदीच्या किनाऱ्यावर झोपला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुंदर झाडं आणि आभाळाचा नजारा आहे. याशिवाय तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मुंबईतील रिमझिम बरसणारा पाऊस पाहायला मिळत आहे.

चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर; रिअल हिरो सोनू सूद धावला यांच्याही मदतीला

याआधी सुतापानं इरफानच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावरही एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. तिच्या त्या पोस्टनंही सर्वांना भावुक केलं होतं. यावेळी सुतापानं इरफानचे काही अनसीन फोटो शेअर केले होते. या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, इथून खूप दूर प्रत्येक चूक किंवा बरोबरच्या पलिकडे एक रिकामं मैदान आहे. तिथे मी तुला भेटेन. जेव्हा आपला आत्मा त्या हिरवळीवर शांतपणे झोपलेला असेल आणि हे जग बोलून थकलेलं असेल. बस्स काही दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आपण भेटू, गप्पा मारू.

2018 मध्ये इरफानला न्यूरोइंडोक्राइनचं निदान झालं होतं. यावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला सुद्धा गेला होता. जवळपास वर्षभर उपचार घेतल्यानंतर तो भारतात परतला. त्यानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत बॉलिवूडमध्ये कमबॅक सुद्धा केलं. काही काळापूर्वी रिलीज झालेला 'अंग्रेजी मीडियम' हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.

DDLJ चा 'पलट' सीन आहे हॉलिवूड सिनेमाची कॉपी, विश्वास नाही बसत तर हा घ्या पुरावा!

First published: June 5, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या