घटस्फोटानंतरही टिकून आहे मैत्री, हृतिकला सुझानने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

घटस्फोटानंतरही टिकून आहे मैत्री, हृतिकला सुझानने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अभिनेता हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या घटस्फोटानंतरही त्यांच्या मैत्रीत कोणतंच अंतर पडलेलं नाही. दोघेही अधुनमधून एकमेकांसोबत दिसतात आणि सोशल मीडियावरही फोटो शेअर करत असतात.

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने शुक्रवारी त्याचा 46 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याला घटस्फोटित पत्नी सुझान खान हिने शुभेच्छा दिल्या. तिने हृतिक आणि तिच्या दोन्ही मुलांसोबतचे फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना म्हटलं की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हृतिक... तु माझ्या जीवनातील सर्वात चांगली व्यक्ती आहेस.'

हृतिक रोशनला वडील आणि अभिनेता, दिग्दर्शन राकेश रोशन यांनीही सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा डुग्गु, तु सुर्याप्रमाणे चमकत रहा आणि तुझ्या प्रकाशाने सर्वांना उजळून टाक असं राकेश रोशन यांनी म्हटलं आहे

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या लूक्स, शरिरयष्टी, डान्स यासाठी लोकप्रिय आहे. त्याच्या फिटनेसचे चाहते असलेल्यांची संख्या मोठी आहे. फिटनेसकडे लक्ष देणारा हृतिक खाद्यपदार्थांचा शौकीन आहे. भरपूर खाऊनही योग्य व्यायामाने त्यानं फिटनेस कायम राखला आहे. डान्स आणि फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या ऋतिकला 'ग्रीक गॉड' असंही म्हटलं जातं.

 

View this post on Instagram

 

‘Happiest Happiest Birthday Rye... you are the most incredible Man I know.. ♥️😇 🎂🎈#tothebestoflifeaheadofyou #10thjan2020🔥🚩 #bestdaddyaward #bestphilosophertoo ☺️

A post shared by Sussanne Khan (@suzkr) on

हृतिक सुझानचा घटस्फोट होऊन 5 वर्षे झाली. तरीही त्यांची मैत्री टिकून आहे. मुलांचा वाढदिवस, घरात पार्टी, न्यू इयर पिकनिक याशिवाय बाहेरही अनेकदा ते एकमेकांसोबत दिसतात. सोशल मीडियावरूनही ते अधुनमधून एकत्र फोटो शेअर करत असतात. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, आम्ही दोघे विभक्त झालो आहोत पण मुलांसाठी मात्र कुटुंब म्हणून एकत्रच आहोत. दोघांनी 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता.

चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 10:39 AM IST

ताज्या बातम्या