Home /News /entertainment /

सुझान खानच्या मिरर सेल्फीवर रूमर्ड BF अर्सलान गोनी फिदा; कमेंट पाहून लाजली Ex मिसेस रोशन

सुझान खानच्या मिरर सेल्फीवर रूमर्ड BF अर्सलान गोनी फिदा; कमेंट पाहून लाजली Ex मिसेस रोशन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan Latest News) ची पूर्वपत्नी आणि इंटिरिअर डिझायनर सुझान खान (Sussanne Khan) सध्या आपल्या खासगी आयुष्याबाबत सतत बातम्यांमध्ये झळकते आहे

मुंबई, 29 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan Latest News) ची पूर्वपत्नी आणि इंटिरिअर डिझायनर सुझान खान (Sussanne Khan) सध्या आपल्या खासगी आयुष्याबाबत सतत बातम्यांमध्ये झळकते आहे. अर्सलान गोनी (Sussanne Khan rumoured boyfriend Arslan Goni) सोबतच्या तिच्या जवळकीमुळे सुझान सध्या चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे आणि दोघंही सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करतानाही दिसतात. आता परत असंच काहीसं झालं आहे. सुझान खानच्या पोस्टवर अर्सलान गोनीने प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे आता चर्चा रंगत आहे. सुझानने शुक्रवारी एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या सेल्फीमध्ये सुझान तिचं ‘आउटफिट ऑफ द डे’ फ्लाँट करत आहे. इंटिरिअर डिझायनर सुझानने रिप्ड डेनिम वाईड पँटसोबत ब्लॅक टँक टॉप आणि टॉपवर कॅमो प्रिंट स्लीव्हलेस जॅकेट घातलंय. सुझानने आपल्या लुकला व्हाईट स्निकर्ससोबत पूर्ण केलं होतं आणि सोबतच एक बॅकपॅक कॅरी केली होती, असं फोटोत दिसतंय. हे वाचा-'पुष्पा' चा मराठी रिमेक पाहिला का?भाऊ-श्रेयाची केमिस्ट्री पाहून आवरणार नाही हसू सुझान खानच्या या फोटोवर अनेक सेलेब्जने प्रतिक्रिया दिली आहे. पण चर्चा होत आहे ती, रूमर्ड म्हणजे सुझानचा तथाकथित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीच्या कमेंटची. अर्सलान गोनीने सुझान खानच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे - ‘गर्ल!’ ज्यावर सुझान खाननेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने दोन इमोजी टाकून अर्सलानबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सुझानचे फॉलोअर्स आणि मित्रांनीही फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी सुझानचा लूक छान असल्याचं सांगितलं आहे तर काहींनी बॅकग्राउंडमध्ये असलेल्या डॉलहाउस शोपिसचं कौतुक केलं आहे. एका युजरने सुझानच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की - ‘लव्हली. डॉल हाउस खूपचं गोड आहे.’ तर इतरही काही युजर्सनी सुझानच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. हे वाचा-VIDEO: पलक तिवारीच्या 'त्या' कृत्याने नाराज इब्राहिम अली खान, आता वाटतीये लाज बिग बॉस 14 मध्ये भाग घेतलेला स्पर्धक अली गोनीचा कझन अर्सलान आणि अभिनेता हृतिक रोशनची आधीची पत्नी सुझान खानला अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांच्या पब्लिक अपियरन्समुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबतही चर्चा होत आहे. अर्सलानला मागच्या वर्षी गोव्यात सुझानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्यासोबत दिसला होता. दोघंही गोव्याहून एकत्रच परत आले होते आणि त्यांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. पण सुझान खान आणि अर्सलान गोनी हे फक्त चांगले मित्र आहेत की, त्यांचं नातं मैत्रीपुढचं आहे. याबाबत मात्र दोघांकडूनही अजून खुलासा करण्यात आलेला नाही.
First published:

Tags: Bollywood News, Hritik Roshan

पुढील बातम्या