मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तुझी खरी आई कोण?' सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीने काय दिलं होतं उत्तर पाहा

'तुझी खरी आई कोण?' सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीने काय दिलं होतं उत्तर पाहा

सुष्मिताची मुलगी रिनीने (Reeni Sen) तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मन जिंकणारी उत्तरं दिली आहेत.

सुष्मिताची मुलगी रिनीने (Reeni Sen) तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मन जिंकणारी उत्तरं दिली आहेत.

सुष्मिताची मुलगी रिनीने (Reeni Sen) तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मन जिंकणारी उत्तरं दिली आहेत.

मुंबई 9 जुलै : अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) दोन मुली आहेत. तर आता त्या मोठ्या देखील झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा सोशल मीडिया आणि मीडिया दोन्ही मध्ये त्या सक्रिय पाहायला मिळतात. त्यातीलच सुष्मिताची मुलगी रिनीने (Reeni Sen) तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची मन जिंकणारी उत्तरं दिली आहेत.

सुष्मिता ने विवाह केला नसला व मुलांना जन्म ही दिला नसला तरीही ती एक उत्तम आई आहे. दोन्ही मुलींना ती अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळते. त्यातील रिनी आता मोठी झाली आहे. काही वर्षांपूर्वी सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

'कोणाशीही कर पण लग्नं कर..' तापसीच्या आई बाबांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता

रिनीला एक प्रश्न नेहमी विचारला जायचं आणि त्याचच उत्तर तिने दिलं आहे. एका मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, “तुला तुझ्या खऱ्या आईविषयी काय जाणून घ्यायचं आहे?” यावर रिनीने मन जिंकणार उत्तर दिलं होतं.

यावर रिणी म्हणाली, “तुम्हाला माहीत आहे का मला इन्स्टाग्रामवर सुद्धा असेच प्रश्न विचारण्यात आले होते. प्लीज ला परिभाषित केलं तर खरी आई असं म्हणता येईल.” ती म्हणाली “मी माझ्या आईच्या मनातून जन्म घेतला आहे.”

Cannes Film Festival 2021: रेड कार्पेटवर अभिनेत्रींचा जलवा; ग्लॅमरस अंदाजात रंगला दिमाखदार सोहळा

पुढे ती म्हणाली की, “मला माहित आहे की लोकांना आमच्या आयुष्यात रस आहे. हे ठीक आहे पण लोकांनी एकमेकांबद्दल चांगले विचार ठेवले पाहिजे. माझं सत्य सगळ्यांसमोर आहे पण काय होईल जर हे कोणी दुसरं असतं तर.. त्यामुळे मला वाटतं आपण थोड संवेदनशील असायला पाहिजे.”

रिनीने शॉर्ट फिल्म ‘सुट्टाबाजी’ मध्ये काम केलं आहे. हे तिचं अभिनयातील पदार्पण होतं. लवकरच रिनी बॉलिवूड मध्येही पदार्पण करणार आहे. स्वतः रिनीने हा खुलासा केला होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Sushmita sen wedding